मुंबई : महाविद्यालयातील एकांकिका ते मालिका आणि नंतर चित्रपटांतील विविधांगी भूमिका साकारत बऱ्याच वर्षांनतर चित्रपटात मुख्य भूमिका साकारायला मिळालेली अभिनेत्री ऋतुजा बागवे भावूक झाली आहे. 'लंडन मिसळ' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यात ऋतुजा बागवे हिने मुख्य भूमिका साकारली असून यात विशेष म्हणजे तिने दुहेरी भूमिका यात सादर केली आहे. त्यानिमित्ताने अलिकडेच तिने एक पोस्ट शेअर केली असून ती भावूक आणि आनंदी झाल्याचे दिसून आले.
काय आहे ऋतुजाची पोस्ट?
"काल स्वतःला प्रमुख भूमिकेत मोठ्या पद्द्यावर पाहिलं. rejection ला मी घाबरत नाही ना मनाला लाऊन घेत. पण एक rejection मनाला खूप लागलं होतं. आणि मग self doubt मनात निर्माण झाला. आपण चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्यास सक्षम नाही आहोत का ?? खरंतर माझं हे स्वप्न नव्हतंच कधी पण “आपण चित्रपटाची heroin होऊ शकत नाही” ह्याची जाणिव करुन दिल्यावर मात्र माझ्या स्वभावानुसार मनात आलं आता हे करायलाच हवं. माझ्या मनात स्वप्न पेरल्या बद्दल त्यांचे आभार “लंडन मिसळ” नायिका/नायक म्हणून माझा पहिला चित्रपट," अशी पोस्ट ऋतुजाने करत तिच्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, ऋतुजाने चंद्र आहे साक्षीला, नांदा सौख्य भरे, अनन्या अशा मालिका आणि नाटकांध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या होत्या. अनन्या नाटकात तिने केलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक देखील झाले होते. ऋतुजाच्या या अतुलनीय अभिनयासाठी बारा मानाच्या पुरस्कारांनी तिचा गौरव करण्यात आला होता.