अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट!, "मविआ सरकार असताना..."

    01-Dec-2023
Total Views |

ajit jayant
 
मुंबई: जयंत पाटलांनी प्रकाश सोळंकेंना प्रदेशाध्यक्ष पदाचा शब्द देऊन तो पाळला नाही असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. कर्जत मध्ये सुरू असलेल्या अजित पवार गटाच्या वैचारिक मंथन शिबिरात ते बोलत होते. त्याच वेळी अजित पवारांनी जयंत पाटलांना विचार करून लोकांना शब्द द्या असा सल्ला दिलाय.

जेंव्हा 2019 ला देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन केले तेंव्हा प्रकाश सोळंकें नाराज झाले होते. त्यावेळीही त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. त्यावेळी ती पूर्ण होऊ शकली नाही पण मी आणि जयंत पाटलांनी त्यावेळी त्यांना कार्याध्यक्ष पदाचा शब्द दिला होता असे अजित पवार म्हणाले.
 
 
त्यावेळी "मी १ वर्षांसाठी प्रदेशाध्यक्ष राहतो तुम्ही त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पद सांभाळा असे जयंत पाटील म्हणाले होते" असे अजित पवारांनी सांगितले. मी जयंत पाटलांना म्हटलं ही होतं की तुम्ही प्रकाश सोळंकेंना शब्द दिला होता त्यावर त्यांनी "वरीष्ठांनी मलाच प्रदेशाध्यक्ष राहण्यास सांगितले आहे" असे उत्तर दिल्याचं ही अजित पवार याप्रसंगी म्हणाले. "एखादा महिना मागे पुढे झाला तरी चालेल पण कार्यकर्त्यांना दिलेला शब्द पळाला गेला पाहिजे . मला कार्यकर्त्यांना नाराज करायला अजिबात आवडत नाही" असेही अजित पवार म्हणाले.