मुंबई : डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय वडाळा येथे दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणुन निवृत्त न्यायाधीश डॉ. डी. के. सोनवणे होते. प्रभारी प्राचार्या डॉ. यशोधरा श्रीकांत वराळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. उपप्राचार्य. प्रा.सुभाषचंद्र सोनकर, प्रा.देविदास शिंदे, प्रा. सुनील वालेचा प्रा. अनुराग आहेर, प्रा.लक्ष्मण बेडेकर, प्रा. कांबळे सर, प्रा.ओझा सर व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी देखील बहुसंख्येने उपस्थित होते.
प्राध्यापक डॉ.देविदास शिंदे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन घेण्याचा कार्यक्रम पार पाडला व उद्देशिकेचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर निवृत्त न्यायाधीश डॉ. डी. के. सोनवणे यांनी धर्मनिरपेक्ष ह्या शब्दाबद्दल व संविधानाबद्दल बोलून आपल्या भाषणाने सर्वांना संबोधित व मंत्रमुग्ध केले. प्राचार्या. डॉ. यशोधरा वराळे यांनी संविधानातील मूलभूत हक्क व मूलभूत अधिकार यांच्याबद्दल माहिती देत कार्यक्रमाचा समारोपपर मार्गदर्शन व संबोधन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्लेष टाव्हरे व जयश्री मोरे ह्या विद्यार्थ्यांनी केले. तर आभार प्रदर्शन जयश्री मोरे यांनी केले व कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.संविधानाबद्दल व त्यातील लहान मोठे पैलू समजून घेण्यासाठी विद्यार्थी यांना मदत व्हावी तसेच कायद्याच्या मुख्य स्थानी असलेल्या संविधानाबद्दल जनजागृती व्हावी हे कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. विद्यार्थी वर्गात अभ्यासाचे वातावरण रहावे याकरिता असे अनेक कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालय करत असते. व त्याकरिता अनेक अनुभवी व मोठ्या वक्ते मंडळींना त्या निमित्ताने बोलवले जाते त्यामुळे विद्यार्थी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमांना नेहमी पाहायला मिळतो.तनिष्क या विद्यार्थ्यांने आभार मानले व राष्ट्रगीता ने कार्यक्रमाचा समारोप झाला