नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.6 इतकी मोजली गेली आहे.तीन दिवसांत भूकंपाचे धक्के बसण्याची ही दुसरी वेळ आहे. दि.३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र नेपाळ होते आणि त्याचे हादरे दिल्लीपर्यंत जाणवले.
दि. ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या या भूकंपात १५७ जणांना आपला जीव गमवावा लागला असून शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. २०१५ मध्ये नेपाळमध्ये ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यानंतर आलेल्या भूकंपामुळे सुमारे ९,००० लोकांचा मृत्यू झाला आणि २२ हजारांहून अधिक लोक जखमी झाले.
भूकंप झाल्यास काय करावे?
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भूकंपांबाबत अलर्ट जारी करत आहे. यानुसार, हादरा बसल्यास घाबरू नका, शांत राहा आणि टेबलाखाली जा. आपले डोके एका हाताने झाकून ठेवा आणि थरथरणे थांबेपर्यंत टेबल धरा.