मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या बायोपिकची लाट सुरु आहे. महापुरुष, इतिहासातील महत्वाच्या व्यक्त आणि खेळाडू यांच्या जीवनावर बायोपिक केले जात असून आता या यादीत आणखी एका क्रिकेटपटूच्या बायोपिकची भर पडणार आहे. याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी यांच्या जीवनावर आधारिक बायोपिक प्रदर्शित झाले असून प्रसिद्ध क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार आहे.
दरम्यान, गौतम गंभीर याची भूमिका अभिनेता विकी कौशल साकारणार असल्याचे सांगितले जात आहे. भारत विरुद्ध आफ्रिकेच्या सामन्या दरम्यान समालोचन करण्यासाठी सहभागी झाला होता. यावेळी विकीने आपल्याला गंभीरच्या बायोपिकमध्ये काम करण्यास आवडेल असे म्हटले होते. द क्रिकेट लाँजने याविषयीचे सविस्तर वृत्त दिले असून आता आणखी एक खेळाडूचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असे दिसून येत आहे.