बुरखा चालेल पण मंगळसुत्र नाही! कर्नाटकात काँग्रेसचे तुष्टीकरणाचे राजकारण जोरात

    06-Nov-2023
Total Views | 75

Karnataka


बंगरुळू : कर्नाटकातील कलबुर्गी येथे रविवारी एका सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षेदरम्यान हिंदू विद्यार्थिनींचे मंगळसूत्र आणि कानातले काढून घेतल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, बुरखा घातलेल्या मुलींना तपासणी करून आत प्रवेश दिला जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.
 
कलबुर्गी येथील प्री-ग्रॅज्युएशन गर्ल्स कॉलेजमधील ही घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवार ५ नोव्हेंबर रोजी कर्नाटक लोकसेवा आयोगातर्फे एफडीए भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, यावेळी तपासणीच्या नावाखाली विद्यार्थिनींचे मंगळसूत्र आणि गळ्यातील चेन काढून घेण्यात आल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.
 
यातील एका विद्यार्थिनीने आरोप केला की, बुरखा घालून आलेल्या मुलींची तपासणी करुन त्यांना बुरख्यातच आत जाण्याची परवानगी देण्यात आली. हिंदू परंपरेत मंगळसूत्र काढणे हे अशुभ आहे. परंतू, अधिकाऱ्यांच्या दबावामुळे असे करावे लागल्याचेही या विद्यार्थिनींनी म्हटले आहे.
 
दुसरीकडे, याआधी काही विद्यार्थ्यांना ब्लूटूथ आणि इतर कॉपी करणाऱ्या साहित्यासह पकडल्यानंतर ही सतर्कता बाळगण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र, तपासाच्या नावाखाली दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा आम्हाला का दिली जात आहे, असा जाब विद्यार्थिनींनी विचारला आहे.
 
काही वेळातच ही बातमी व्हायरल झाली. भारतीय जनता पक्षाचे विजयपुरा येथील आमदार बसनगौड़ा यांनी विचारले की, हा नियम फक्त हिंदूंसाठी आहे का? याप्रकरणाचा वाढता विरोध बघता अनेक अधिकारी महाविद्यालयात पोहोचले. तसेच तपासणीच्या नावाखाली महिलांचे मंगळसूत्र काढू नये, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.



अग्रलेख
जरुर वाचा
लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

Tej Pratap Yadav जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले. पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई ..