केंद्र सरकारचा मोठा निर्णय! महादेव ॲपसह २२ बेकायदा बेटिंग ॲप्सवर बंदी

    06-Nov-2023
Total Views | 65

Mahadev App


नवी दिल्ली :
केंद्र सरकारने महादेव ॲपसह २२ बेकायदा बेटिंग ॲप्सवर बंदी आणली आहे. ईडीच्या शिफारसीवरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने २२ बेटिंग ॲप्स बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ईडीच्या चौकशीनंतर महादेव ॲप ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
 
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याप्रकरणी सांगितले की, "छत्तीसगड सरकारला हे महादेव ॲप बंद करण्याची शिफारस करण्याचा अधिकार होता, पण त्यांनी यासंबंधी कोणतीही विनंती केली नाही."
 
ते पुढे म्हणाले, "याप्रकरणाची ते दीड वर्षांपासून चौकशी करत आहेत, परंतु या काळात छत्तीसगड सरकारने एकदाही हे ॲप बंद करण्याची मागणी केली नाही." हे अवैध ॲप बंद करण्याची एकच मागणी ईडीकडून पुढे आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी महादेव ॲप प्रवर्तकांकडून ५०८ कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर शुभम सोनी नावाच्या व्यक्तीने एक व्हिडीओ शेअर करत आपण महादेव बेटिंग ॲपचा मालक आहोत असा दावा केला आहे. तसेच आपणच मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ही रक्कम दिली असल्याचेही त्याने सांगितले आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121