नवी दिल्ली : हरियाणातील एका फार्मास्युटिकल कंपनी मिट्सकार्टने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त कार भेट म्हणून दिली आहे. दरम्यान, दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना भेट म्हणून काही वस्तू दिल्या जातात. तशीच काहीसी अनोखी भेट हरियाणातील एका फार्मास्युटिकल कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना देऊ केली आहे.
दरम्यान, मिट्सकार्टचे मालक एम के भाटिया म्हणाले की, आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना सेलिब्रिटीप्रमाणे सेवा देऊ इच्छितो म्हणून दिवाळी भेटस्वरुपातील कार दिली आहे, अस त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एकूण वेतनातील २० टक्के भाग दिवाळी बोनस म्हणून जाहीर करण्यात केला आहे.
तसेच, आपल्या कर्मचाऱ्यांना कार भेट देऊन सेलिब्रिटी अनुभव देण्याचा विचार सकारात्मक भावनेतून आला असल्याचे भाटिया जरुर सांगतात. तसेच, उर्वरित ३६ कर्मचाऱ्यांनादेखील कार देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.