छ. संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास केंद्र
03-Nov-2023
Total Views | 30
मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर येथील ‘पर्यटक निवास’ राज्यातील प्रथम पूर्णतः महिला संचालित पर्यटक निवास म्हणून कार्यान्वित झाले आहे. तसेच खारघर रेसिडेन्सीचे अर्का रेस्टॉरंटही पूर्णतः महिला संचालित रेस्टॉरंट म्हणून चालविण्यात येत आहे.
महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचलिका श्रद्धा जोशी-शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आणि महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटक निवास, राज्यातील प्रथम पूर्णतः महिला संचालित पर्यटक निवास म्हणून पर्यटकांच्या सेवेत दाखल झाले आहे.
येथील सर्व कर्मचारी या महिला असून, येथे येणार्या पर्यटकांना पर्यटनाचा आणि आदरातिथ्याचा अनोखा अनुभव देण्यासाठी ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ’ सज्ज झाले आहे. पर्यटक निवासात आलेल्या बंगाली पर्यटक सुतापा चॅटर्जी यांच्या हस्ते गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी मुंबई, छत्रपती संभाजी नगर, खारघर येथे महिला संचलित पर्यटक निवासाचा शुभारंभ करण्यात आला.