ज्ञानवापी प्रकरण! सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षकारांची याचिका फेटाळली
03-Nov-2023
Total Views | 55
लखनऊ : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षकारांची याचिका फेटाळून लावली. मुस्लिम पक्षकारांने बाजूच्या वतीने ज्ञानवापी प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयाऐवजी अन्य उच्च न्यायालयाकडे सोपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मुस्लिम पक्षकारांची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
ज्ञानवापी प्रकरण २०२१ पासून सुनावणी करणाऱ्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठातून मागे घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या प्रशासकीय निर्णयाला अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर मंदिर उघडण्याची मागणी करणाऱ्या खटल्याच्या देखरेखीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर एकल न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती.
मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने मशीद समितीचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर याचिका फेटाळून लावली. खंडपीठाने म्हटले की, "आम्ही उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या आदेशात हस्तक्षेप करणार नाहीत."
३० ऑक्टोबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने एआयएमसीच्या याचिकेवरील सुनावणी ८ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली होती. २ नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालयाने एएसआयला ज्ञानवापी मशीद संकुलात सुरू असलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल दाखल करण्यासाठी १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. एएसआयने न्यायालयाला सांगितले की त्यांनी ज्ञानवापी मशीद संकुलाचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे परंतु अहवालाचा मसुदा तयार करण्यासाठी आणखी वेळ लागेल. त्यामुळे एएसआयला ही मुदतवाढ देण्यात आली आहे.