रवींद्र वायकर ईडीच्या कचाट्यात, ठाकरेंच्या अडचणीत वाढ!

    03-Nov-2023
Total Views | 95
ED registers money laundering case against Ravindra Waikar

मुंबई : कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीकडून ऑक्टोबरमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. त्यानंतर आता ईडीने रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ईडीने मनी लॉड्रिंग प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्यावरही गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच मुंबई पोलीसांनी वायरकांसह ६ जणांवर ही गुन्हा दाखल केलेला आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणात गुन्ह्याच्या दृष्टीने तपास करत आहेत.
 
रवींद्र वायकर यांच्यावर कोणते आरोप?

जुलै २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोगेश्वरी येथे लहान मुलांच्या खेळाच्या मैदानावर २ लाख स्केवअर फुटाचे ५०० कोटी रुपयांचे ५ स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी रवींद्र वायकर यांना दिली होती. दरम्यान मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बॅक्वेटच्या नावाने हा शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप वायकर यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. तरी लवकरच रवींद्र वायकर यांना ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे 'हिसाब तो देना पडेगा' असे म्हणत सोमय्यांनी वायकरांना टोला लगावला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे

हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे 'लँड माफिया', योगी आदित्यनाथ यांचा टोला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या सावळा गोंधळावरून टीका केली आहे. त्यांच्यावर प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत होत आणि आता मात्र वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121