मुंबई : “हिंदुत्व हा माझा प्राण आहे”, असे अभिनेता प्रसाद ओक याने म्हणत त्याच्या लेखी हिंदुत्वाची व्याख्या त्याने मांडली आहे. ‘धर्मवीर २... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटाचा मुहुर्त संपन्न झाला. यावेळी ‘महाएमटीबी’शी बोलताना प्रसाद ओक याने त्याच्यासाठी हिंदुत्व काय आहे? हे व्यक्त केले. २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते मंगेश देसाई प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.
हिंदुत्व हे हिंदुस्थानातील प्रत्येकाचे सर्वस्व असायला हवे
“हिंदुत्व हे हिंदुस्थानातील प्रत्येकाचे सर्वस्व असायला हवे. माझ्यासाठी हिंदुत्व हा माझा प्राण आहे. मी हिंदुस्थानात राहतो. मी हिंदु असल्याचा मला दर्व आणि अभिमान आहे. आणि जी-जी माणसं हिंदुत्वासाठी झटत, सोसत आली आहेत, ती प्रत्येक माणसं माझ्या मनात देवाच्या जागी आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे या सगळ्यांसाठीच मनात अपार अभिमान आहे. हिंदुत्व मोठं करण्यासाठी आणि जपण्यासाठी ज्यांनी कष्ट केले आहेत त्यांना माझा मुजरा आहे”.