उत्तर प्रदेश पोलिसांची मोठी कारवाई! देशविरोधी कृत्य करणाऱ्या इसिसच्या दोन एजंट्सला अटक

    28-Nov-2023
Total Views | 55

Uttar Pradesh


लखनौ :
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) इसिसच्या दोन एजंट्सला अटक केली आहे. भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी पाकिस्तानकडून निधी घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. रियाजुद्दीन आणि अमृतपाल सिंग उर्फ ​​अमृत गिल अशी त्यांची नावे आहेत.
 
ते दोघेही भारतीय लष्करी तळ आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था इसिसला पाठवत असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय देशविरोधी कृत्य करण्यासाठी त्यांच्या खात्यात पैसे पुरवल्याचीही माहिती पुढे आली आहे. तसेच याप्रकरणातील आणखी एक आरोपी इजहारुल हुसेन हा बिहारमधील बेतिया तुरुंगात असल्याचेही सांगितले जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक संशयास्पद स्त्रोतांकडून पैसे मिळवत असल्याची माहिती एटीएसला मिळली होती. तसेच हा पैसा इसिसकरिता भारतविरोधी हेरगिरीच्या कारवायांसाठी वापरला जाईल अशी शंका त्यांना आली. त्यानंतर एटीएसने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
 
तपासादरम्यान, मार्च २०२२ ते एप्रिल २०२२ या कालावधीत गाझियाबाद येथील आरोपी रियाजुद्दीनच्या बँक खात्यातून सुमारे ७० लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार उघड झाले. रियाजुद्दीन आणि इजहारुल यांची राजस्थानमध्ये भेट झाली. येथे दोघेही वेल्डिंगचे काम करायचे. इथेच हे दोघेही पाकिस्तानी गुप्तचर संस्था इसिसच्या संपर्कात आले. त्यांनी इसिससाठी काम करणाऱ्या इतर एजंट्सला पैसे पाठवायला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.
 
दरम्यान, याप्रकरणी एटीएसने रियाजुद्दीनला २६ नोव्हेंबर रोजी अटक केली. तसेच इजहारुल हुसैन याला बिहारच्या बेतिया पोलिसांनी ८ नोव्हेंबरला दारू पिण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. बिहार दारूबंदी कायद्यांतर्गत त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून तो सध्या तुरुंगात आहे.
 
याशिवाय याप्रकरणी पंजाबमधील भटिंडा येथील २५ वर्षीय अमृतपाल सिंग उर्फ ​​अमृत गिलचे नावही पुढे आले आहे. रियाजुद्दीनने त्याच्या खात्यावर पैसे पाठवल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या पैशाच्या बदल्यात अमृतपालने भारतीय लष्कराच्या रणगाड्यांशी संबंधित माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला पाठवली असल्याचा एटीएसचा दावा आहे. २३ नोव्हेंबर रोजी भटिंडा येथे त्याला अटक करण्यात आली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121