नवी दिल्ली : भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे (आयसीसीआर) देशाची राजधानी दिल्ली येथे भारतीय ज्ञान प्रणाली या विषयालर दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रहबुद्धे यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, जगभरातील ३० देशातील ८० हून अधिक शिक्षणतज्ज्ञ ४ आणि ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय ज्ञान प्रणालीचे विषय शिकवणाऱ्या विभागप्रमुखांचा समावेश आहे. नॉलेज-इंडिया व्हिजिटर्स प्रोग्रॅम या उपक्रमाचा उद्देश जगभरातील भारतीय ज्ञान प्रणालीशी संबंधित विषयांना चालना देणे आणि पुढील वाटचालीवर चर्चा करणे हा असल्याचे डॉ. सहस्रबुद्ध म्हणाले.
परिषदेचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याहस्ते केंद्रीय राज्यमंत्री मिनाक्षी लेखी यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे परिषदेचा समारोप करणार आहेत.