मुंबई : 'मुंबई पोर्ट अथॉरिटी'अंतर्गत विविध पदांकिरता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. मुंबई पोर्ट अथॉरिटी मधील विविध रिक्त पदांच्या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीप्रक्रियेद्वारे मुंबई पोर्ट अथॉरिटीमध्ये नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे.
मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या माध्यमातून मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत ‘सुरक्षा अधिकारी, कल्याण अधिकारी, वरिष्ठ कल्याण अधिकारी, Dy. व्यवस्थापक (कल्याण), हिंदी अधिकारी, हिंदी अनुवादक Gr.-II’ या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या विविध पदांच्या एकूण १४ रिक्त जागांसाठी अर्जदाराने अंतिम मुदत दि. ०६ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज भरावयाचा आहे.
मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत होणाऱ्या भरतीकरिता पदांनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून क्लास १ मधील ९ पदे तर क्लास २ मधील ५ पदे भरण्यात येणार आहेत. तसेच, अर्जदारास अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने करावयाचा आहे. भरतीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.