मुंबई : रेल्वे मार्गाची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी कोकण रेल्वेने दि. १ डिसेंबर रोजी रत्नागिरी ते वैभववाडीदरम्यान सकाळी ८.३० ते ११ वाजेपर्यंत अडीच तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे.
यामुळे परिणाम होणाऱ्या गाड्या
- गाडी क्र. १६३४६ - थिरुवनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) मुंबई या गाडीचा प्रवास दि. ३० नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. मात्र, ही गाडी उडपी ते कणकवलीदरम्यान अडीच तासांसाठी थांबवण्यात येईल.
- गाडी क्र. १०१०६ - सावंतवाडी ते दिवा एक्स्प्रेस ही गाडी दि. १ डिसेंबर रोजी सुटणार असून सावंतवाडी ते कणकवली दरम्यान ३० मिनिट थांबवण्यात येईल.
- गाडी क्र. १२०५१ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (छशिमट) ते मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस दि. १ डिसेंबर रोजी सुटणार असून रत्नागिरी स्टेशनवर दहा मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.
प्रवाशांनी या बदलाची दखल घेत सहकार्य करावे, असे आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.