विश्वचषकाच्या आयोजनामुळे 'या' कंपन्यांना झाला कोट्यावधींचा फायदा

    25-Nov-2023
Total Views |
 world cup
 
मुंबई : भारतीय संघाचा अंतिम सामन्यात पराभव झाला असला तरी, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विश्वचषकाचे आयोजन खुप फायदेशिर ठरला आहे. विश्वचषकादरम्यान, देशातील मद्य, विमान वाहतूक आणि ऑनलाईन फूड डिलव्हरी कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. विश्वचषकादरम्यान, फूड डिलव्हरी कंपन्यांच्या ऑडर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.
 
त्याचबरोबर भारताच्या १० शहरांमध्ये विश्वचषक सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट चाहत्यांनी विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी विमान प्रवासाला प्राधान्य दिले. त्यामुळे विमान वाहतूक कंपन्यांना सुद्धा याचा फायदा झाला. भारताच्या अंतिम सामन्यादिवशी साडेचार लाखांपेक्षा जास्त लोकांनी विमान प्रवास केला. हा देखील एक उच्चांक आहे.
 
विश्वचषकादरम्यान, या कंपनींच्या वाढलेल्या विक्रीमुळे शेयर बाजारात यांच्या शेयरच्या किंमतीत सुद्धा तेजी राहिली. ऑनलाईन फूडच्या विक्रमी ऑर्डर्समुळे झोमॅटो आणि स्विगीच्या बाजार मूल्यात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या इंडिगोच्या शेअर्समध्येही वाढ झाली.
 
विश्वचषकादरम्यान हॉटेलच्या भाड्यात देखील लक्षणीय वाढ झाली होती. अहमदाबादमध्ये झालेला भारत-पाकिस्तान सामना आणि विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्यावेळी शहरांमध्ये हॉटेलमध्ये एक रात्र राहण्याचा खर्च लाखोंच्या घरात पोहोचला होता. त्यामुळे भारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला असला तरी, यशस्वी आयोजनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागला आहे.