संस्कार करणारे, माणसे घडवणारे केंद्र

    25-Nov-2023
Total Views | 49
Dr. Ashok Kukde on Motibag


मोतीबाग हे नुसते कार्यालय नाही. मोतीबाग हे ‘संस्कार’ देणारे केंद्र आहे. वास्तू उत्तम असणे, तिथे सोयीसुविधा असणे यापेक्षाही त्या ठिकाणाहून जी निर्मिती होते आहे- संघकार्याची निर्मिती, समाजनिर्मिती आणि राष्ट्रनिर्मिती - ती अधिक महत्त्वाची आहे. भविष्यकाळात मोतीबागेच्या माध्यमातून अशाच प्रकारे काम सुरू राहील. कारण, मनुष्य निर्मितीचे आणि चारित्र्य निर्मितीचे काम ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे...

मोतीबाग कार्यालय या नावाने पुण्यातल्या शनिवार पेठेत जी वास्तू ओळखली जाते, ती फार दीर्घकाळाचे संघ कार्यालय आहे. संघाच्या महाराष्ट्र प्रांतात ज्या काही गतिविधी गेली 70 वर्षे होत आहेत, त्याचे ते साक्षी आहे. योगायोग असा की, त्या कार्यालयाचा आणि माझा व्यक्तिशः खूप जवळचा, दीर्घकाळचा संबंध राहिलेला आहे.पुण्यात संघाचे काम खूपच जुने, साधारणपणे जवळपास 90 वर्षांचे. परंतु, सुरुवातीच्या काळात ‘कार्यालय’ या नावाची वास्तू नव्हती. काम वाढायला लागले तशी त्याची गरज भासायला लागली. परंतु, संघाची अवस्था सुरुवातीच्या तर फारच ‘अकिंचन’ होती. काम करणार्‍या पूर्णवेळ कार्यकर्त्यांना दोन वेळ जेवण मिळेल, याचीसुद्धा भ्रांत होती. प्रवास करण्यासाठी खर्च मिळेल हीसुद्धा शक्यता नव्हती, तर कार्यालय कुठून होणार? पण, 1952 साली महात्मा गांधी यांच्या हत्येनंतरच्या बंदीतून बाहेर आल्यावर काम जसे स्थिर व्हायला लागले, तशी कार्यालयाची गरज भासायला लागली. पण, पैसा कुठून आणायचा?

शनिवार पेठेतल्या सरदार बिवलकरांची ही जागा हे एक मोटार अड्डा आणि मोटार गॅरेज होते. एक मध्यम आकाराचे मैदान, बाजूला एक शेड, मोटार गॅरेजला लागतो तसा एक मोटार चढवण्यासाठीचा कट्टा आणि बाजूला कच्च्या बांधकामाच्या चार-सहा खोल्या अशी तिथली स्थिती होती. बिवलकरांना संघकार्याविषयी आत्मियता होती. त्यांनी ही जागा देऊ केली. पैसा जमा करणे अवघड होते. त्यांनी किंमतही सांगताना फारच सौम्य स्वरुपात सांगितली. पण ती ही पुरी करणे अवघड होते. मात्र ते धाडस केले. त्याकाळी प्रांत प्रचारक असलेले आणि पुढे प्रांत संघचालक झालेले ज्येष्ठ कार्यकर्ते, ख्यातनाम वकील बाबाराव भिडे यांनी त्यात पुढाकार घेतला. जागेचे पैशाचे व्यवहार पुढे अनेक वर्षं सावकाश सावकाश पूर्ण होत गेले. मी शनिवार-नारायण पेठांतल्या शाखांमध्येच बाल स्वयंसेवक, बाल शिक्षक या नात्याने कार्यरत होतो. त्यामुळे मोतीबागेत नेहमी येणे असे. मोतीबागेत जी ‘प्रल्हाद’ शाखा भरत असे, त्या शाखेत मुख्य शिक्षक म्हणून माझी नेमणूक 1956 मध्ये झाली. मी त्यावेळी वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षाला होतो.

माझी वैद्यकीय महाविद्यालयातली पुढची पाचही वर्षे या शाखेत शिक्षक, मुख्य शिक्षक, कार्यवाह या नात्याने जबाबदारी सांभाळत होतो. त्यामुळे मोतीबाग कार्यालयाचा रोज एकापेक्षा जास्त वेळेला संबंध येई. सकाळी मोतीबागेत एक छोटी तालीम चालायची. तिला आम्ही यायचो आणि संध्याकाळी शाखा. त्याखेरीज, रोज चालणार्‍या वेळी-अवेळी होणार्‍या बैठका या सगळ्यामुळे मोतीबागेला हळूहळू संघ कार्यकर्त्यांनी गजबजलेली जागा असे स्वरुप यायला लागले. कार्यालय म्हणावे अशी स्थिती खरेच काही नव्हती. छोट्या एकत्रीकरणाला काही प्रमाणात शेडचा उपयोग आम्ही करीत असू. मैदानामध्ये शाखा भरायची मात्र ते खरे मैदान नव्हते, त्यामुळे अडचण असायची. बाजूच्या ज्या काही कच्च्या बांधलेल्या खोल्या होत्या, त्यामध्ये एक स्वागत कक्षासारखी जागा, एक छोटे स्वयंपाकघर, एखादी खोली व्यवस्थापकांना राहण्यासाठी आणि एखाद दुसरी खोली सामान ठेवण्यासाठी- जिथे घोषाचे सामान आणि विजेचे सामान ठेवले जात असे. मी स्वतः घोषातही होतो. त्यामुळे त्यानिमित्ताने मोतीबागेच्या वार्‍या होत असत.

संघकामाचे ‘चळवळ’ हे स्वरूप जसजसे अधिक व्हायला लागले तसतसे मोतीबागेतले चलनवलन वाढले. काही वर्षांतच ते एक सदैव जीवंत असणारे, सचेतन असणारे असे केंद्र झाले. इथे सारखे तरुण येताहेत, गप्पागोष्टी चालल्यात, गीत गायन सुरू आहे, शाखेच्या वेळेत शाखा सुरू आहे, अन्य वेळांत संवाद सुरू आहेत, असे सगळे वातावरण निर्माण झाले. नंतरच्या काळात, मुख्यतः प्रचारक म्हणून येत असत, अशा ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा निवासही तिथे व्हायला लागला. मला आठवते त्याप्रमाणे बाळासाहेब साठे हे शहर प्रचारक म्हणून आले. त्यांचा निवास तिथे झाला. तात्या बापट यांचा निवास तिथे झाला. पुढे दामूअण्णा दाते, वसंतराव केळकर अशा ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा निवास तिथे व्हायला लागला.

पुढे मोतीबागेत पहिले बांधकाम झाल्यानंतर काही बर्‍यापैकी खोल्या तयार झाल्या आणि मग अधिकार्‍यांचे वास्तव्य त्या ठिकाणी होऊ लागले. बाळासाहेब देवरसांचे, रज्जूभैयांचे, सुदर्शनजींचे आणि नंतर सध्याचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे वास्तव्य तिथे झाल्याचे मी अनुभवले आहे. त्याखेरीज इतरही अधिकारी तिथे वास्तव्याला येत असत. मोठ्या बैठका मात्र खूप होत असत. गुरुजींच्या बैठका झालेल्या मला आठवत आहेत. गुरुजींची बैठक म्हणजे अनुशासनाचा आणि चैतन्याचा एक अनुभव असे. प्रत्येकाची व्यक्तिशः चौकशी होत असे. त्या शाखेचे काम कसे चालले आहे, याची माहिती घेतली जात असे. सोबत बहुधा त्यावेळी तत्कालीन प्रांत संघचालक काशीनाथपंत लिमये हेही असत. गुरुजींचे योग्य त्या प्रकारचे पाथेय त्या ठिकाणी मिळत असे. या बैठका, त्यातल्या छोट्या-मोठ्या प्रसंगांसकट माझ्या ध्यानात आहेत. त्याखेरीज, ज्या कार्यकर्त्यांची नावेही आज कदाचित अनेकांना माहिती नसतील, अशा ज्येष्ठ कार्यकर्त्यांसोबत सहवास आणि त्यांचे बौद्धिक वर्ग ऐकण्याचे भाग्य मला लाभले. दादाराव परमार्थ हे पू. डॉक्टरांचे सहकारी. अत्यंत बुद्धिमान आणि अत्यंत उत्तम वक्तृत्व असलेले दादाराव यांचा बौद्धिक वर्ग मी तिथे ऐकलेला मला आठवतो. श्रावणे मास्तर हे डॉक्टरांचे सहकारी होते. त्यांचा बौद्धिक वर्ग ऐकल्याचे मला आठवते.


वर्णेकर शास्त्रींचा संस्कृत बौद्धिक वर्ग मला आठवतो. याखेरीज यादवराव जोशी, काशीनाथपंत लिमये, परप्रांतातून किंवा नागपूरहून अधूनमधून येणारी अन्य मंडळी या सगळ्यांची त्या ठिकाणी बैठक किंवा बौद्धिक वर्ग यांचा अनुभव मी घेतला आहे. अनेक कामे तिथे चालत असत. थोडीशी गिचमीड असे. घोषाची वाद्ये ठेवण्याची जागाही तिथेच होती. कधीकधी घोषाचा सरावही तिथे चालत असे. 1956 मध्ये अरण्येश्वरला पहिले प्रांतिक शिबीर झाले होते. मी घोषात होतो. आमचा घोषाचा सराव तिथे चालत असे. वाद्यांची दुरूस्ती करण्याचे काम तिथे चालत असे. त्याखेरीज विद्युत विभागाचे साहित्यही तिथे ठेवले जात असे. बाळ आपटे हे त्याचे प्रमुख होते. याखेरीज, एक नवीन संस्था त्या ठिकाणी निर्माण झाली आणि ती बरीच वर्ष त्या ठिकाणी कार्यरत होती. नित्य संघकामाशी संबंधित नसलेली ‘हिंदुस्थान साहित्य’- जिचे नेतृत्व बापूराव दाते यांनी केले. या प्रकाशन संस्थेचे कार्यालय आणि आत्ताच्या परिभाषेत म्हणायचे तर ‘शो रूम’ त्या ठिकाणी होते. बापूराव स्वतः एका अर्थाने पूर्णवेळ कार्यकर्ते होते. आधी घोष विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पुणे शहराचे बालप्रमुख म्हणून जबाबदारी होती आणि पुढे हा नवीन विभाग पूर्णपणे उभा करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. ‘हिंदुस्थान साहित्य’ हे प्रकाशन आणि त्याच्याच बाजूला संघ वस्तू भांडार निर्माण झाले.

या ठिकाणी गणवेश, पट्टा, टोपी या सगळ्याची विक्रीची व्यवस्था होत असे. तिथे झालेले काही विशेष कार्यक्रम माझ्या स्मरणात आहेत. पुणे शहरातील ही महत्त्वाची शाखा असल्यामुळे बाहेरून येणारे ज्येष्ठ कार्यकर्ते हे हमखास येथे येत असत. मला अटलबिहारी वाजपेयी हे आमच्या शाखेवर आलेले आठवतात. मी मुख्य शिक्षक असतानाच ते घडले होते. भारतीय जनसंघाचे अखिल भारतीय अधिवेशन मोतीबागेपासून जवळच असलेल्या नातू मंगल कार्यालयात भरले होते. संध्याकाळी शाखेवर ही सगळी मंडळी शाखावेशात आली. मुख्य शिक्षक या नात्याने मी शाखा घेतली होती. शाखा संपल्यानंतर सगळ्यांना मंडलात उभे राहून परिचय करून द्यायला सांगितला. अटलजींनी त्यांचा परिचय ‘मैं लखनौ का स्वयंसेवक हूं’ म्हणून करून दिलेला माझ्या स्मरणामध्ये आहे. त्याखेरीज जनसंघातील अनेक मोठे कार्यकर्ते, पं. प्रेमनाथ डोगरा, भाई परमानंद अशी मंडळी त्या शाखेवरती आलेली त्यांचे बौद्धिक वर्ग झालेले माझ्या स्मरणात आहेत. ज्या प्रमुख कार्यकर्त्यांचा तिथे निवास राहिला, ज्यांच्या कर्तृत्वाचा त्याठिकाणी विकास झाला आणि त्याचे चांगले परिणाम संघ कार्यावरती दिसले, अशी काही नावे म्हणजे दामूअण्णा दाते, तात्याराव बापट, मुकुंदराव पणशीकर आणि वसंतराव केळकर. हे सगळे प्रांताचे कार्यकर्ते होते, त्यांच्या कर्तृत्वाच्या वेगवेगळ्या पैलूंचे दर्शन त्याकाळात आम्हाला झालेले आहे. मोतीबागेमध्ये नित्य संघकामाशिवाय असंख्य विषय चालत असत.

वेगवेगळ्या विचारधारांचे लोक तिथे येत असत. त्यांच्याबरोबर संवाद होत असे. त्यासाठी मुद्दाम बोलावले जात असे. त्या वास्तूमध्ये त्यांचे स्वागत केले जात असे. त्यांच्याबरोबर खुली चर्चा होत असे. मला आठवते की, समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांना एकदा बोलावले होते. त्यांच्याबरोबर मुक्त चर्चा झाली. त्याकाळच्या दलित चळवळीतले बंडखोर नेतेही त्या ठिकाणी आलेले आहेत आणि फार छान चर्चा त्यांच्या झाल्या आहेत. अशा चर्चा बहुधा दामूअण्णांच्या बरोबर होत असत. कारण दामूअण्णांकडे, आपल्या विरोधात विचार मांडणार्‍यांनाही योग्य त्याप्रकारे सांभाळून घेण्याची फार मोठी कला होती. त्यातूनच पुढे ‘समरसता मंच’ या संस्थेचा जन्म झाला. ‘समरसता मंच’ या संस्थेचे किंवा या विचाराचे जन्मस्थान मोतीबाग कार्यालय हे आहे, असे म्हणता येईल.अनेक भिन्न भिन्न उपक्रम तिथे चालत. उदाहरण द्यायचे झाले, तर 1967 मध्ये चिंचवडला खूप मोठे प्रांतिक शिबीर भरले होते. त्याचे सगळे सूत्रसंचालन मोरोपंत पिंगळे यांनी मोतीबागेत बसून केले होते. अशा अनेक कार्यक्रमांचे संचालन तिथून व्हायचे. पू. गुरुजींना 1956 मध्ये 50 वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्याच्यासाठीचे पूरक कार्यक्रम, तयारीचे कार्यक्रम हे सगळे मोतीबागेत होत असत. संघाचा विचार पसरवणे, प्रस्थापित होणे, कार्यकर्ते निर्माण होणे त्यांची भूमिका स्पष्ट होणे, हे सगळे हसत खेळत होणे, याखेरीज बौद्धिक वर्गाच्या माध्यमातून संघकार्याची नुसती थिअरी नाही, तर बाबाराव भिडेंसारख्यांच्या बौद्धिक वर्गातून होणारे प्रॅक्टिकल, हे सगळे योग्य प्रकारे मांडले जाणे अशी सगळी मोतीबागेत चालणार्‍या असंख्य कार्यक्रमांची साखळी होती. पुणे शहराच्या माध्यमातून सबंध प्रांतभरात जे असंख्य कार्यकर्ते निर्माण झाले, जे संघकार्याला गेल्या 60-70 वर्षांत पूरक ठरले, मग ते पुण्यात किंवा पुण्याबाहेर कुठेही असतील, त्यांची जडणघडण मोतीबागेत झाली आहे, असे म्हणता येईल. मी स्वतः पुणे सोडून 55 वर्षे होऊन गेली आहेत. मी हे म्हणू शकतो की माझी जी काय जडणघडण झालेली असेल ती अधिकात अधिक मोतीबागेत झाली आहे. त्या शाखेवरती असतानाच मी विस्तारक म्हणून कामाला निघालो. त्या शाखेवर असतानाच संघ कार्याविषयीचे शारीरिक, बौद्धिक, वैचारिक पाठ हे मी गिरवले आहेत. मला असे वाटते की, असंख्य कार्यकर्त्यांचा माझ्यासारखाच हा अनुभव असेल.
 
कालानुरूप पुढे मोतीबागेत परिवर्तने झाली. आता तर मोठे परिवर्तन झाले आहे. एक खूप मोठे कार्यालय उभे राहिले आहे. दर खेपेला कार्यालय उभे होत असताना, संघाच्या पद्धतीनुसार आपण त्याच्या अर्थकारणासाठी समाजाकडे कधी गेलो नाही. हा आग्रह धरला की स्वयंसेवकांनी स्वतःच्या पैशांनी हे कार्यालय उभे केले पाहिजे. आतासुद्धा कोटींच्या खर्चात झालेले नवे कार्यालय हे संघ कार्यकर्त्यांनी दिलेल्या निधीमधून झाले आहे. हे वैशिष्ट्य सगळ्यांनी आवर्जून समजावून घेतले पाहिजे, असे मला वाटते. कारण, संघकार्य हे पूर्णपणे स्वायत्त राहिले पाहिजे, असा आग्रह पहिल्यापासून धरला गेला. तो आजतागायत धरला जातो. नुसता धरला जातो असे नाही, तर तो कठोरपणे अंमलात आणला जातो. इतर सर्व सार्वजनिक संस्थांना सुद्धा, विशेषतः राष्ट्रीय दृष्टीने देशपातळीवर काम करणार्‍यांना हा एक धडा आहे की, आमचा निधी हा शुद्ध असेल, कार्यकर्त्यांनी निर्माण केलेला निधी असेल आणि हा निरपेक्ष असेल.

मोतीबाग हे नुसते कार्यालय नाही. मोतीबाग हे संस्कार देणारे केंद्र आहे, माणसे घडवणारे केंद्र आहे. मला अनेक वेळा वाटते की, या वास्तू दिसायला पार्थिव असतात. कारण, त्या पृथ्वीमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासून बनवल्या जातात. पण, त्या नुसत्या पार्थिव नसतात, त्यांना ‘आत्मा’ असतो. तिथे जे काम चालते, तिथे जो विचार मांडला जातो आणि त्याला अनुलक्षून जो व्यवहार होतो, त्याच्यातून समाजाचे भले करणारे संघटन आणि दीर्घकाळ चालणारा विचार हा प्रसृत (प्रस्तुत) होतो. हे त्याचे सामर्थ्य असते. म्हणून असे म्हणता येईल की, या मोतीबागेला ‘आत्मा’ आहे आणि तो या सगळ्याला प्रेरणा देणारा आहे. या वास्तूत निर्माण झालेल्या आत्म्याला प्रेरणा देणे, त्याच्यात शक्ती भरणे हे स्वयंसेवकांच्या कामातून झाले आहे. अशी ही उभयपक्षी देवाणघेवाण, ज्याला आमच्या वैद्यकीय परिभाषेत ‘फीड बॅक मेकॅनिझम’ म्हणतात, तशा प्रकारचे हे काम आहे. कार्यालयाची वास्तू उत्तम असणे हे अपेक्षित असेल. पण, नुसती वास्तू उत्तम असणे, तिथे सोयीसुविधा असणे याच्यासाठी कार्यालय नाही. त्या ठिकाणाहून जी निर्मिती होते आहे- संघकार्याची निर्मिती, समाजनिर्मिती आणि राष्ट्रनिर्मिती - ती अधिक महत्त्वाची आहे.

त्याकडे आजवर कटाक्षाने लक्ष पुरवले गेले आहे. तसेच लक्ष यापुढेही पुरवले जाईल, असा विश्वास वाटतो. कारण, आजही त्याच पद्धतीने काम सुरू आहे हे अनुभवाला येत असते. भविष्यकाळात, मोतीबागेच्या माध्यमातून अशाच प्रकारे काम सुरू राहील. कारण, अशा संघटनेची गरज ही समाजाची स्थायी, कायमची गरज आहे. मनुष्य निर्मितीचे आणि चारित्र्य निर्मितीचे काम ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. म्हणून संघाचे काम हे राष्ट्रीय चारित्र्य निर्मितीशी आणि त्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीशी जोडले गेले आहे. त्याचे दर्शन हे मोतीबागेत चालणार्‍या हालचाली, चळवळी, विचारविनिमय, बैठका, बौद्धिक वर्ग, कार्यक्रम, उपक्रम या माध्यमांतून होत राहिले आहे आणि होत राहील. संघकार्याच्या या दर्शनात काळानुरुप बदल होत राहिले आहेत, भविष्यकाळातही होत राहतील. मात्र, त्याचा ‘आत्मा’ मी वर्णन केल्याप्रमाणे हा देश, इथली संस्कृती, इथला समाज याच्याशी नाळ जोडलेला आणि विहित कार्याच्या दृष्टीनेच योगदान देणारा असा सामर्थ्यसंपन्न राहील, असा मला विश्वास वाटतो.


- डॉ. अशोक कुकडे


अग्रलेख
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला...

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...