मुंबईत ४ वर्षांत सायबर गुन्ह्यांत २४३ टक्क्यांची वाढ! प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात धक्कादायक बाब

क्रेडिट कार्ड आणि फसवणुकीच्या तक्रारी अधिक; गुन्हेगार सापडण्याचे प्रमाण केवळ ८ %

    23-Nov-2023
Total Views | 57

Cyber Crime


मुंबई :
 जगभरात सगळीकडेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमालीचे वाढले असून आणि मुंबईही त्याला अपवाद नाही. मुंबईमध्ये सन २०१८ ते २०२२ या दरम्यान त्यात २४३ टक्क्यांनी वाढ झाली असून यामध्ये क्रेडीट कार्ड घोटाळे/फसवणुकीचे' सायबर गुन्हे सर्वाधिक नोंदवलेले असून त्यांचे प्रमाण ६५७ टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या माध्यमातून समोर आली.
 
मुंबईतील पोलीस यंत्रणा आणि कायदा व सुव्यवस्थेची सद्यस्थिती २०२३' हा प्रजा फाऊंडेशनचा अहवाल गुरुवार, २३ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाला. त्यावेळी अहवालाबाबत कंपनीचे सीईओ मिलिंद म्हस्के आणि प्रजा फाउंडेशनच्या संशोधन व विश्लेषण विभागांचे प्रमुख योगेश मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत महिती दिली.
 
तातडीने या वास्तवाची गंभीर दखल घेऊन पोलीस व कायदा व्यवस्थेतील सुधारणांना प्राधान्य दिले पाहिजे, असे या अहवालात म्हटले आहे. या अहवालामध्ये पोलीस यंत्रणेतील सुधारणा, गुन्हेगारीचे स्वरूप व प्रमाण, बालकांविरुद्धचे लैंगिक गुन्हे (पोक्सो) आणि सायबर गुन्हे यांचे वाढते चिंताजनक प्रमाण, फोरेन्सिक विभाग आणि पोलीस दलातील अपुरे मनुष्यबळ या मुद्द्यांची तपशीलवार चर्चा केलेली आहे.
 
अहवालातील धक्कादायक बाबी
 
- गेल्या १० वर्षात (२०१३ ते २०२२), बलात्कार आणि विनयभंगाच्या नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे १३० टक्क्यांनी (३९१ वरून ९०१) आणि १०५ टक्क्यांनी (१,१३७ वरून २,३२९) वाढ.
- २०२२ मध्ये दाखल एकूण बलात्काराच्या गुन्ह्यांपैकी ६३ टक्के केसेस अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या असून त्या 'पोकसो'खाली दाखल.
- 'पोकसो'खाली दाखल गुन्ह्यांपैकी ७३ टक्के केसेसचा तपास सन २०२२ च्या अखेरपर्यंत प्रलंबित.
- सन २०१८ मध्ये मुंबई पोलीस यंत्रणेतील रिक्त पदांचे प्रमाण २२ टक्के जे २०२२पर्यंत वाढून ३० टक्के
- गुन्हे तपास अधिकाऱ्यांच्या एकूण मंजूर पदांपैकी २२ टक्के पदे जुलै २०२३ पर्यंत रिक्त
- सन २०२२च्या अखेपर्यंत एकूण ४४ केसेसची फोरेन्सिक चाचणी प्रलंबित आणि मार्च २०२३ अंती संबंधित फोसेन्सिक विभागात ३९ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121