रोहितसेनेच्या विजयासाठी देशभरात पुजा-पाठ! अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला

    19-Nov-2023
Total Views | 47

Cricket


मुंबई :
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना पार पडणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. दरम्यान, भारताला विश्वचषक मिळावे यासाठी देशभरातील जनता प्रार्थना करत आहे. यासाठी पुजा, हवन, उपवास करण्यात येत आहे.
 
रविवारी दुपारी २ वाजता हा सामना सुरु होणार असून दोन्ही संघ अहमदाबादमध्ये पोहोचले आहेत. दुसरीकडे, देशाच्या कानाकोपऱ्यात भारताच्या विजयासाठी पुजा-पाठ करण्यात येत आहे. रतलाम, कानपूर, पंचकुला, मुंबई, ऋषिकेशसह अनेक शहरांमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फोटोंची पुजा केली जात आहे. तसेच काही ठिकाणी सुंदरकांड पठण देखील केले जात आहे.
 
एवढंच नाही तर भारताला विश्वचषक मिळावे यासाठी अनेक चाहत्यांनी निर्जला उपवासही केला आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये १० मुलांनी उपवास केला आहे. जोपर्यंत भारताला विजय मिळत नाही तोपर्यंत काहीच खाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
याशिवाय देशातील अनेक मोठमोठ्या मंदिरांमध्ये भारताच्या विजयासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. अयोध्येतील श्री राम मंदिरातील पुजाऱ्यांनी रामललाला प्रार्थना केली आहे. तसेच वाराणसीमध्ये काही मुस्लिम महिलांनी भारताच्या विजयासाठी नमाज अदा केली. अमृतसरचे सुवर्ण मंदिर आणि तामिळनाडूतील सेलम येथील पेरुमल मंदिरातदेखील पुजा करण्यात येत आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121