पुणे : जगदीश मुळीक फांऊंडेशन तर्फे आयोजित धीरेंद्र शास्त्री यांच्या मंत्रमुग्ध अमृतवाणीतुन पुण्यनगरीत हनुमान कथा सत्संग व दिव्य दरबार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती असेल. तर, या कार्यक्रमाचे आयोजन माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केलं आहे.
सोमवार, दि. २० नोव्हें. रोजी सायं. ४ वा. हनुमान कथा सत्संग, दि. २१ नोव्हें. रोजी दु. १२ वा. दिव्य दरबार, सायं. ४ वा. हनुमान कथा सत्संग. दि. २२ नोव्हें. सायं. ४ वा. हनुमान कथा सत्संग असे तीन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निकम फार्म, संगमवाडी येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.