नितीश कुमारांचं फर्मान! हिंदू सणांच्या सुट्ट्या रद्द
16-Nov-2023
Total Views | 192
पाटणा : बिहारमधील नितीश कुमार सरकारने छठ सणाच्या सुट्या रद्द केल्या आहेत. बिहारमध्ये नवनियुक्त शिक्षकांना रुजू करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशात छठ या सणाला सर्व शाळा सुरु राहणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, यावेळी मुख्याध्यापकांनादेखील सुटी घेता येणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच ज्यांनी यापूर्वी रजा घेतली होती त्यांच्या सुट्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. नवनियुक्त शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्याचा तर्क शिक्षण विभागाकडून लावण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता ६ वी पर्यंतच्या वर्गांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. दिनांक २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत त्यांचे निवासी प्रशिक्षण पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बिहारमध्ये छठ पुजा हा पवित्र सण असतो. त्यामुळे ईदच्या वेळी इफ्तार पार्टी देणाऱ्या सरकारने सुट्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी लाखों बिहारी लोकांचा एकदाही विचार केला नसल्याची टीका त्यांच्यावर करण्यात येत आहे. तसेच नितीश कुमार सरकारच्या या निर्णयामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.