मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वानखेडेवर विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना खेळविण्यात येत आहे. या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी वानखेडेवर विविध सेलिब्रिटींनी याठिकाणी उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरसोबत यावेळी इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटूदेखील आवर्जून उपस्थित होता.
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या सेमीफायनल सामन्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली असून यात इंग्लंडचा माजी स्टार फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमचाही समावेश आहे. तो सचिन तेंडूलकरसोबत प्रेसिडेन्शियल बॉक्समध्ये बसून सामन्याचा आनंद घेत आहे. हे दोन्ही दिग्गज युनिसेफचे ब्रँड अम्बेसेडर असून सामन्याआधी ते मैदानात दिसून आले होते.