मुंबई : राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनॉनॉ. मनोरंजनसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, आपल्या अभिनयाच्या जोरावर क्रितीने हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी झेंडा रोवला आहे. सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा नेपोटिझमचा मुद्दा वर आला असून यावर आता क्रितीने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. "प्रेक्षक स्टार किड्सपेक्षा टॅलेंटेड कलाकारांना बघणं पसंत करतात”, असे क्रिती म्हणाली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणनंतर आता नेपोटिझमबद्दल क्रितीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
क्रितीने नुकतीच वोग या मासिकाला एक मुलाखत दिली होती. यात नेपोटिझमवर उघडपणे भाष्य करत क्रिती म्हणाली, "बाहेरुन येणाऱ्या कलाकारांसाठीही आपण सारख्याच संधी निर्माण केल्या तर त्यांच्यासाठी सिनेसृष्टीत काम करणं जास्त सोपं होईल. जर तुम्ही स्टारकिडला लाँच करत असाल, तर टॅलेंट असलेल्या एखाद्या बाहेरच्या कलाकाराही संधी मिळेल याची काळजी घेतली पाहिजे. आजकाल प्रेक्षकही स्टार असलेल्या कलाकारांपेक्षा टॅलेंट असलेल्या कलाकारांना बघणं पसंत करतात."
नेपोटिझमवर काय म्हणाली दीपिका?
दीपिका म्हणाली, “माझ्याजवळ तर कोणताच दुसरा मार्ग नव्हता. त्यामुळे मी नेहमीच समोर येईल त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकवेळी यशस्वी झाले असे नाही, पण प्रयत्न करत राहिले आणि मला यश मिळत गेले. १५-२० वर्षांपूर्वी मी बाहेरची होते. आता मी त्यांच्यापैकी एक आहे. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या क्षेत्रात स्वत:चे नाव कमविण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. तुमचे आई वडील कोण आहेत? याच्याशी कुणाला काही देणेघेणे नसते. तुम्ही, तुमचे काम आणि तुमची कार्यक्षमता हे महत्वाचे आहे. नेपोटिझमसारखी गोष्ट ही कधीही संपणारी नाही. ती यापुढील काळातही सुरुच राहणार असेही दीपिका यावेळी स्पष्टपणे म्हणाली.