देशात मुस्लीमांना लक्ष्य केलं जातं आहे, काँग्रेसकडून अशी अपेक्षा नव्हती!

    15-Nov-2023
Total Views | 72

Omar Abdullah


बंगळुरू :
कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने भरती परीक्षेच्या वेळी हिजाबसारख्या डोकं झाकण्याऱ्या कपड्यांवर बंदी घातली आहे. दरम्यान, यावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात मुस्लीमांना लक्ष्य केलं जात असून काँग्रेसकडून अशी अपेक्षा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
ओमर अब्दुल्ला म्हणाले की, “ही निराशाजनक बाब आहे. काय घालावे आणि काय घालू नये यात सरकार हस्तक्षेप का करेल? विशेषत: मुस्लिमांना लक्ष्य करत नियम जारी केले जात असतात. पूर्वी कर्नाटकमध्ये असे घडायचे तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटत नव्हते कारण त्यावेळी भाजपचे सरकार होते. परंतू, काँग्रेसच्या राजवटीत असे आदेश जारी होणे हे निराशाजनक आहे," असे त्यांनी म्हटले आहे.
 
पुढे ते म्हणाले की, "कांग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मी आवाहन करेन की, त्यांनी कर्नाटकात जारी केलेल्या आदेशाचा पुन्हा एकदा विचार करावा. तसेच त्यांनी हा आदेश मागे घ्यावा," असेही त्यांनी म्हटले आहे.
 
दरम्यान, कर्नाटकमध्ये भरती परीक्षेच्या वेळी कुठल्याही प्रकारे डोकं किंवा तोंड झाकणाऱ्या कपड्यांवर बंदी आणण्यात आली आहे. परिक्षेच्या वेळी केवळ मंगळसूत्र घालण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्रात ब्लूटूथ, इयरफोन यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यासही बंदी घालण्यात आली आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

Tej Pratap Yadav जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले. पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई ..