इसिसच्या पुणे मॉड्यूलविरुद्ध एनआयएकडून आरोपपत्र दाखल; अनेक धक्कादायक खुलासे समोर
10-Nov-2023
Total Views | 125
पुणे : इसिस या दहशतवादी संघटनेच्या पुणे मॉड्यूलविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने आरोपपत्र दाखल केले आहे. हे दहशतवादी भारतीय संविधानाला गैर इस्लामिक मानत असून ते गैर-मुस्लीम लोकांना मारण्याची योजना आखत असल्याचे या आरोपत्रात सांगण्यात आले आहे.
एनआयएच्या आरोपपत्रात पुणे इसिस मॉड्यूलच्या सात सदस्यांची माहिती देण्यात आली आहे. हे दहशतवादी गैर-मुस्लिमांवर हल्ला करण्याचा कट रचत असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच मुस्लिम तरुणांना शिक्षण देऊन देशात शरिया कायदा प्रस्थापित करणे हे त्यांचे ध्येय असल्याची माहिती समोर आली आहे.
या दहशतवाद्यांनी इस्लाममध्ये लोकशाही 'हराम' (गैर इस्लामिक) आहे आणि इसिस केवळ शरियाचे पालन करते, अशी समज मुस्लिमांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही या आरोपपत्रात म्हटले आहे. तसेच पुणे मॉड्युलचा दिल्ली दंगलीशी संबंध असल्याचेही या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
२०२० च्या दिल्ली दंगलीचा मास्टरमाईंड असलेल्या शरजील इमामशी इसिसच्या पुणे मॉड्यूलच्या दहशतवाद्यांचा संबंध असल्याचेही या आरोपपत्रात सांगण्यात आले आहे. दरम्यान, सध्या इसिसच्या दहशतवाद्यांच्या अटकेची कारवाई सुरु असून अलीकडेच दिल्ली, लखनौ, मुरादाबाद, अलीगड आणि छत्तीसगडच्या दुर्गमधून अनेक दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.