वसई : वसईतील साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित "एकविसावा साहित्य जल्लोष" या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात परिसंवाद आयोजित करण्यात आला. परिसंवादाचा विषय कृत्रिम बुद्धिमत्ता तारक की मारक असा होता. पुढील काळात कृत्रिम बुध्दीमत्ताच जगावर अधिराज्य गाजविणार आहे. प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्ता काम करणार आहे. कृत्रिमबुध्दीमत्तेचा सकारात्मक वापर फायदेशीर ठरणार असल्याचे मत परिसंवादातून व्यक्त करण्यात आले.
या परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून वसई - विरार चे प्रथम महापौर राजीव पाटील उपस्थित होते. या परिसंवादात आयटी तज्ञ डॉ भूषण केळकर, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, संगणक तज्ञ आणि लेखक विवेक मेहत्रे, रुचिरा सावंत यांचा सहभाग होता.
कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर हे पाहिलं चर्चासत्र आहे असे डॉ भूषण केळकर म्हणाले, संविधान जेवढं चांगलं वापरलं जाईल तेवढं ते चांगलं राहिल असं डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. त्याच प्रमाणे कृत्रिम बुध्दीमत्तेचा चांगला वापर केला तर ते फायदेशीर ठरेल. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे येत्या १०-१५ वर्षात बदल घडणार असुन तरुणपिढी यासाठी तयार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता तारक की मारक तर हे तारक ही आहे आणि मारक सुद्धा आहे. जसे की याचा वापर जितका चांगला तितका वाईट आहे, पण वापरणाऱ्या माणसांवर अवलंबून आहे. पुल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली मधील पात्र देखील एआयच्या माध्यमातून तयार केले जाऊ शकते असे त्यांनी सांगितले.
पुढे विवेक मेहेत्रे म्हणाले AI च महत्व कळणं काळाची गरज आहे. जॉन मॅककार्थी यांनी १९५६ साली आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा शोध लावला होता. तसेच कालांतराने ह्या तंत्रज्ञानाला खूप मागणी वाढू लागली. भविष्यात ह्याच तंत्रज्ञानाचा बोलबाला असणार आहे. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान मानवी जीवनाचा एक हिस्सा बनणार आहे. विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे आत्मसात केले पाहिजे. चॅट जीपीटी फुकट आणि महासागर आहे. चॅट जीपीटी च्या चांगल्या , वाईट अश्या दोन्ही बाजू आहेत. या वापरामुळे नवीन कल्पकता जन्माला येते. ९० टक्के लोक AI ला शिव्या देतात कारण जॉबच्या प्रश्नामुळे जसे कॉम्प्युटरला देत होते. योग्य रीतीने भान ठेवून वापर केला पाहिजे. हे आधुनिक तंत्रज्ञान सुशिक्षितांना देखील त्याची फार माहिती नसल्याची खंत व्यक्त केली . एआय १० सेकंदात चित्रकार राजा रवी वर्मापेक्षा १०० पटीने चांगले चित्र काढून देऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.
रुचिरा सावंत यांनी एआय वापरण्यासाठी इंटेलिजन्स होण्याची गरज व्यक्त केली. आपण स्वतः शिकलो पाहिजे मुलांना मार्गदर्शन करायला पाहिजे. असे रुचिरा सावंत यांनी सांगितले. असे तर विज्ञानाला मर्यादा असते तर अधिक ज्ञान म्हणजे विज्ञान. विज्ञानाचे भय बाळगू नका. असे मत ज्ञानेश महादेव यांनी व्यक्त केले.