मोहित सोमण
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट मध्ये स्थिरता ठेवून दरात कुठलाही बदल केला नाही. त्यामुळे जागतिक स्तरावरील अर्थकारणावर देशभरात या निर्णयाचे स्वागत पहायला मिळाले. आर्थिक स्तरावरील अपेक्षा, रुपयांचे अवमूल्यन, चढे महागाई दर यामुळे बँक व आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. यावरून नक्कीच सर्वसामान्य गुंतवणूकदारांना म्युच्यअल फंड गुंतवणुकीचे काय करावे हा प्रश्न मनात आला असेल.
पुन्हा एकदा ' Withdrawal of Accommodation' या तत्वावर आरबीआयने शिक्कामोर्तब केले आहे. बँकेला थोड्या कालावधीसाठी ज्या दरात वित्त पुरवठा होतो तो पुन्हा एकदा रेपो रेट ६.५ टक्केच ठेवण्यात आला आहे. वित्तीय पतधोरण समितीनेही महागाईच्या समस्येवर आपली निरीक्षणे नोंदविली आहेत. भाजीपाला, क्रुडचा बदललेल्या किंमतीमुळे महागाईचे लोण येण्याची शक्यता होतीच शिवाय आर्थिक नाड्या आवळल्या गेल्याने वित्त मागणी व पुरवठयावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआयने रेपो दरात तसेच ठेवले आहेत. अर्थतज्ज्ञांच्या मते भारतात महागाई नियंत्रणात आली असली व विकासदर चांगल्याप्रकारे असताना देखील तरी महागाई इंडेक्स ४ टक्यांहून अधिक असल्याने खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी नोंदविले आहे. देशाबाहेरील देखील आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी आरबीआयचा कल असला पाहिजे असे मत नोंदवले.
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी महत्वाच्या टीप्स
१- आरबीआयच्या रेपो दरात बदल न झाल्यामुळे आहे त्याच रणनितीने म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू ठेवावी. गुंतवणूक आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना या गुंतवणूकीचे लक्ष पूर्ण करण्यासाठी खिळून रहायला हवेत.
२) अत्यंत कमी कालावधीसाठी गुंतवणूकींचा विचार केल्यास म्युच्युअल फंड चांगला पर्याय ठरू शकतो.
३) विशेषतः छोट्या कालावधीचे बाँड, कॉर्पोरेट बाँड फंड, बँकिंग, पब्लिक सेक्टर युनिट फंडाचा विचार संयुक्तिक ठरू शकतो.
४) रेपो दराचा विचार करता आता दर स्थिर ठेवल्याने छोटी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना याच कमी कालावधीसाठी मोठा लाभ मिळू शकतो.
५) अजून आरबीआयने कर्ज रक्कमेवर किती आगामी व्याजदर असेल हे जाहीर केले नसले तरी देखील नियोजनपूर्वक गुंतवणूक केल्यास त्याचा लाभ होऊ शकतो.