राजस्थानच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या गहलोतांना उपराष्ट्रपतींनी सुनावले

    06-Oct-2023
Total Views | 33

jaydeep dhanjkar

जयपुर :
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या राज्य दौऱ्यावर आक्षेप घेतला होता. या आक्षेपाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे. ६ ऑक्टोबरला उपराष्ट्रपती धनखर यांनी राजस्थानमधील सीकर येथे एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव न घेता त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

उपराष्ट्रपती म्हणाले, "मी यापूर्वीही अनेक ठिकाणी गेलो आहे. पण तुम्ही पुन्हा पुन्हा का येता? असे काही जणांनी विचारले. मला थोडे आश्चर्य वाटले कारण, असे म्हणणाऱ्या व्यक्तीने ना संविधान वाचले, ना कायदा, ना आपल्या पदाची प्रतिष्ठा राखली. बोलणाऱ्यांनी थोडा विचार केला असता, कायद्यात डोकावले असते, तर त्यांच्या लक्षात आले असते की भारताच्या उपराष्ट्रपतींचा कोणताही दौरा अचानक होत नाही. तो खूप विचारनंतर होतो.


यावेळी त्यांनी एक शायरीसुद्धा ऐकवली,
'खता क्या कि हमने, बताई ही नहीं
आपत्ति क्यों है उन्हें, हमारे घर आने की बताई नहीं
यह कैसा मंजर है,समझ से परे है
सवालिया निशान क्यों है, अपने घर आने के
क्या जुर्म है बताए नहीं ...'

तरी, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम, तेलंगणात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजित आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121