गंगटोक : सिक्कीममध्ये बुधवारी अचानक ढगफुटी झाल्याने तिस्ता नदीला पूर आला. या घटनेत आतापर्यंत २१ लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक बेपत्ता आहेत. या पुरात भारतीय लष्कराचे २३ जवानही बेपत्ता झाले होते. अद्याप त्यांचा शोध सुरुच आहे.
दरम्यान, भारतीय लष्कराकडून उत्तर सिक्कीममध्ये अडकलेल्या नागरिकांना आणि पर्यटकांना अन्न, वैद्यकीय मदत आणि दळणवळण सुविधा पुरवण्यात येत आहेत. सिक्कीममध्ये आलेल्या पुरामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले असल्याने राज्यातील दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे.
तसेच पुरामुळे रस्त्यांवर गाळ साचला आहे. सिक्कीममधील विवध भागांतील आठ पुल उध्वस्त झाले आहेत. राज्यातील विविध भागात ३ हजारांहून अधिक पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वातावरण व्यवस्थित राहिल्यास अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुरानंतर रस्ते व इतर ठिकाणी गाळ साचला आहे. त्यांची साफसफाई करण्याचे कामही सुरू आहे. सात जवानांचे मृतदेह सापडले असून मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी यांनी सांगितले आहे.