उत्तराखंड समान नागरी कायद्याचा केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी घेतला आढावा
05-Oct-2023
Total Views | 34
नवी दिल्ली : उत्तराखंडच्या समान नागरी कायदा मसुदा समितीच्या सदस्यांनी बुधवारी रात्री केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी सदस्यांनी गृहमंत्री शाह यांना मसुद्याविषयी सविस्तर माहिती दिल्याचे समजते.
उत्तराखंडमध्ये लवकरच समान नागरी कायदा लागू होणार आहे. कायद्याच्या मसुदा समितीच्या सदस्यांची गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत सदस्यांची नुकतीच बैठक झाली. समान नागरी कायद्याचा अंतिम अहवाल आणि त्याची अंमलबजावणी याबाबत बैठकीत चर्चा झाली. याशिवाय उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही बुधवारी अमित शहा यांची भेट घेतली आहे.
उत्तराखंड समान नागरी कायदा मसुदा समितीचा अहवाल पुढील १५ दिवसांत सादर केला जाऊ शकतो. त्यानंतर तो विधानसभेत ठेवण्यात येईल आणि त्याला कायद्याचे स्वरूप देण्याची प्रक्रिया केली जाईल. उत्तराखंडच्या धर्तीवचर देशातील समान नागरी कायदा लागू केला जाऊ शकतो.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या उत्तराखंडला भेट देणार आहेत. यावेळी ते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत तीन बैठका घेणार असून, त्यामध्ये निवडणुकीची तयारी आणि रणनीती यावर चर्चा केली जाणार आहे.