दहशतवादाचा समुळ नाश करण्यास केंद्र सरकार सज्ज – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

राष्ट्रीय दहशतवादविरोधी परिषदेस दिल्लीत प्रारंभ

    05-Oct-2023
Total Views | 39

amit shaha

नवी दिल्ली :
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे तिसऱ्या दहशतवादविरोधी परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षेला सध्याच्या आणि उदयोन्मुख धोक्यांवर चर्चा होणार आहे. त्यामध्ये परदेशातून कार्यरत खलिस्तान समर्थक अतिरेक्यांना होणार अर्थपुरवठा आणि हिंसक कारवायांचाही समावेश आहे.

बैठकीपूर्वी गृहमंत्र अमित शाह ‘एक्स’वर म्हणाले की, “मोदी सरकार देशातून दहशतवादाचा समूळ उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध आहे. नवी दिल्लीत एनआयएने आयोजित केलेल्या तिसऱ्या दहशतवादविरोधी परिषदेचमध्ये देशापुढील धोक्यांचा सामना करण्यासाठी सविस्तर चर्चा होणार आङे. त्याचप्रमाणे या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या राष्ट्रासाठी स्विकारलेल्या दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुतेच्या धोरणास अधिक बळकटी प्रदान करण्यात येणार आहे”, असेही गृहमंत्री शाह यांनी म्हटले आहे.

उच्चस्तरीय दोनदिवसीय बंदद्वार बैठकीत रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (रॉ), इंटेलिजन्स ब्युरो (आयबी), सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय), राज्य दहशतवादविरोधी पथके (एटीएस), राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (एनटीआरओ) सहभागी होत आहेत. यावेळी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, आयबीचे संचालक तपन डेका, विविध राज्यांचे पोलिस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

पाच प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार
परिषदेत दहशतवादी इकोसिस्टिम उध्वस्त करणे, दहशतवादाचा प्रभावी तपास करणे, दहशतवादी फंडिंग ट्रेंड, युएपीए आणि आणि इतर कायदेशीर तरतुदींचा वापर करून दहशतवादाच्या गुन्ह्यांचा तपास करणे, डिजिटल फॉरेन्सिक आणि डेटा अॅनालिटिक्सद्वारे गुंतवणुकीच्या बुद्धिमत्तेची साठवण या पाच प्रमुख विषयांवर बैठकीचा भर असणार आहे. दोनदिवसीय परिषदेत पाच विविध सत्रांमध्ये चर्चा होणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121