कलाकारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी पु. ल. देशपांडे कला अकादमीचा पुढाकार
05-Oct-2023
Total Views |
मुंबई : कोव्हीडच्या काळामध्ये कलाकारांचा डेटाबेस नसल्याने अनेकांना गैरसोय झाली होती. त्यामुळे पु. ल. देशपांडे कलाकादमीने मागील दीड वर्षात ज्यांना कुठेही संधी मिळाली नव्हती अशाच कलाकारांना, संस्थांना संधी देऊन कार्यक्रम आयोजित केले आहे. दरम्यान अनेक कलाकारांचा डेटाबेस नसल्याची खंत वरिष्ठ कलाकारांनी देखील मांडले आहे.
ही समस्या लक्षात घेऊन कलाकारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी पु. ल. देशपांडे कलाकादमीकडून एक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. कलाकारांनी अकादमीच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळाला भेट देऊन कलाकार भांडार ह्या टॅब वर क्लिक करून माहिती भरावी. हा डेटाबेस अकादमीकडे असेल. ज्यांना ज्यांना असा डेटाबेस हवा असेल त्यांनी कृपया अकादमीशी ईमेल द्वारे संपर्क साधावा.
अकादमीच्या पुढील कार्यक्रमात देखील या डेटाबेस मधूनच कलाकारांची निवड करण्यात येइल. या प्रकल्पासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सचिव विकास खारगे यांचा पुढाकार असल्याची माहिती प्रकल्प संचालक, संतोष रोकडे यांनी दिलेली आहे. तरी सर्व कलाकारांनी ही या प्रणालीचा फायदा घ्यावा असे आवाहन आहे.