मुंबई : 'महाराष्ट्र वीज नियामक आयोगां'तर्गत रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगामार्फत यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याभरतीद्वारे, महाराष्ट्र वीज नियामक आयोग मुंबई मधील अध्यक्ष, अपक्ष सदस्य पदाच्या १६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
एमईआरसी अंतर्गत होणाऱ्या पदभरतीकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ नोव्हेंबर २०२३ असणार आहे. तसेच, अर्जदारास आपला अर्ज सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, १३ वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, सेंटर नंबर-1, कफ परेड, मुंबई – ४००००५, या पत्त्यावर पाठवायचा आहे. एमईआरसी भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.