लखनऊ : उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्यात साधू बनून फिरणाऱ्या तीन लोकांना दि. २९ ऑक्टोबर २०२३ रोजी अटक करण्यात आली. नंदी दर्शनाच्या नावाखाली ते लोकांकडून पैसे उकळायचे. अनीस, वली मोहम्मद आणि शाकीर अशी त्यांची ओळख उघड झाली आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उसावन पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे रविवारी ३ संशयित व्यक्ती साधूच्या वेशात नवीगंज गावात दाखल झाल्या. त्या सर्वांकडे प्रत्येकी एक बैल होता. बेल, हार, चंदनाचा टिळक इत्यादीच्या साहाय्याने त्यांनी बैलाला नंदीचे रूप दिले होते. घरोघरी जाऊन भीक मागण्यासोबतच ते लोकांना बैलांचा आशीर्वादही देत होते. त्याच्या बोलण्यावरून लोकांना संशय येऊ लागला. गावकऱ्यांनी तिघांनाही थांबवून विचारपूस सुरू केली. दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तिघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत तिघेही मुस्लिम समाजातील असल्याचे निष्पन्न झाले. शाहजहांपूर जिल्ह्यातील अनीस आणि वली मोहम्मद आणि हरदोई जिल्ह्यातील शाकीर अशी त्यांची नावे आहेत. तिघांनीही सांगितले की, ते बैल त्यांचेच आहेत ज्याद्वारे त्यांनी पैसे कमवण्यासाठी हिंदूंचा वेश धारण केला होता. हे तिघेही अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागात काम करत होते.
तिन्ही आरोपी नातेवाईक आहेत. त्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्यावर फसवणूक आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांनी तिन्ही बैलांची सुटकाही केली आहे. या तिघांच्या नोंदी आजूबाजूच्या जिल्ह्यांतून तपासण्यात येत आहेत, अशी माहिती पोलिस स्टेशनचे प्रभारी रमेंद्र सिंह यांनी दिली. या सर्वांची रेकी वगैरेची शक्यताही पोलीस तपासत आहेत.
साधूच्या वेशात फिरणाऱ्यांना बैलांसह अटक करण्याची ही पहिली घटना नाही. जुलै २०२२ मध्ये बिहारमधील हाजीपूर येथील एका मंदिराबाहेर 6 मुस्लिम तरुणांना पकडण्यात आले होते, जे हिंदू साधूच्या वेषात भिक्षा मागत होते. सर्व तरुण उत्तर प्रदेशातील बहराइच येथील रहिवासी होते. सोबत एक नंदीही ठेवला. त्याचप्रमाणे बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातून तीन मुस्लिम तरुण हिंदू साधूंच्या वेशात भिक्षा मागताना पकडले गेले.