ESG ची व्याप्ती वाढणे हे अमृतकाळात महत्वाचेच

    03-Oct-2023
Total Views | 114
 
 
ESG
 
 
ESG ची व्याप्ती वाढणे हे अमृतकाळात महत्वाचेच
 
मोहित सोमण
 
नुकतेच Economic Advisory Council चे सदस्य व पंतप्रधान सल्लागार संजीव संन्याल यांनी आफ्रिकन पार्टनरशिप कॉन्फरन्स मध्ये बोलताना Environmental ,Social , Governance ( ESG) चे महत्व अधोरेखित केले आहे. उद्योजक अब्जोपती असो किंवा छोट्या लिस्टेड कंपनीचा सीईओ इएसजी ( ESG) चे पालन करणे अनिवार्य आहे. सेबीच्या नियमावलीनुसार याचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे.
 
 
इएसजी मध्ये Enviornmental, Social , Governance ची मार्गदर्शक तत्वे बनवली असतात. प्रत्येक व्यवसायिक याची पूर्तता करतो. प्रत्येक व्यवसायाला मर्यादा असताना त्यातील आव्हाने, संधी, परिवर्तन व नियमावली यांच्यात ताळमेळ ठेवून व्यवसाय करावा लागतो‌. परंतु जुन्या व्यवसायिक पद्धतीने नफ्यासाठी काहीही हा दृष्टिकोन ठेवून चालणार नाही. नियमांचे पालन, स्ट्रक्चरल ऑडिट, पर्यावरणाचे संवर्धन, सुरक्षेची व कामगारांच्या स्वास्थाची काळजी, अलीकडेच लोकप्रिय झालेले नेट झिरो ( कार्बन विरहीत पर्यावरण)या फ्रेमवर्कचा विचार करणे व या चौकटीतच व्यवसाय आजच्या घडीला करावा लागतो.
 
 
नक्की ESG म्हणजे काय?
 
 
१- एन्विरॉन्मेंटल ( पर्यावरण विषयक ) - या प्रकारच्या निर्बंधांत कंपनी रोजच्या कारभारात कार्बन न्यूट्रलायझेशन चा विचार करावा लागतो. कुठलेही उत्पादन घेताना कार्बनचा वापर कमीत कमी करून पर्यावरण पूरक उलाढाल करावी लागते. कंपनीच्या लेखापरीक्षकाने नैसर्गिक संसाधने व त्याचा विनिमय यांची कारणींमासा करणे उद्योगांना क्रमप्राप्त आहे. नैसगिक संकटाच्या काळात देखील काही नियमावलीनुसार उपाययोजना करणे कंपनीला आवश्यक आहे.
 
 
- सोशल ( सामाजिक) - अर्थव्यवस्थेकडे लक्ष देताना सामाजिक भान जपणे हे देखील उद्योगांना बंधनकारक आहे. सामाजिक घटक, कर्मचारी यांचे शोषण करून व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न केल्यास कंपन्यांवर सेबी कारवाई देखील करू शकते. अलीकडे निघालेल्या CSR ( Corporate Social Responsibility) हा देखील यातला महत्त्वाचा घटक आहे. कुठलीही कंपनी आपल्या संसाधनाचा विनिमय शेवटी समाज, निसर्ग, भौतिकता यातूनच करत असते. त्यामुळे समाजाला कंपनी एक प्रकारे देण लागते. सामाजिक भान जपतानाच समाजहितासाठी अर्थसहाय्य किंवा जनकल्याण कारक प्रकल्प व्यवसायांना करता येतात. व इतर पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी या सुत्राचा वापर केला जातो. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होऊ न देणे हे सोशल फ्रेमवर्कचे मुख्य उद्दिष्ट आहे.
 
 
३) गव्हर्नन्स ( सुशासन) - कंपनीच्या जडणघडणीत वास्तविकतेत कंपनी कुठल्या आधारे चालवली जाते याचे काही निकष असतात. नैतिकतेच्या आधारे कंपन्या कारभार करतात का याचे मूल्यमापन वेळोवेळी यंत्रणा करत असतात. कंपनीतील गुंतवणूकदार, सप्लाय चेन, सहयोगी यांचे आर्थिक, सामाजिक वैयक्तिक रित्या नुकसानापासून संरक्षण करणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. कारभारात पारदर्शकता हा याचा मुख्य गाभा आहे.
 
 
जागतिकीकरणानंतर व्यवसायाचे बदललेले स्वरूप बघता या तत्त्वांची गरज देखील युनायटेड नेशन्सलाही जाणवू लागली. तंत्रज्ञानाच्या विस्तारासोबतच अत्याधुनिक सामुग्रीचा वापर करताना पर्यावरणाला ठेच पोहोचू नये यासाठी हा विचार पुढे आला.
 
 
जरी " इएसजी " हा शब्द २००४ च्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात प्रथम मुख्य प्रवाहात आला असला तरी २०१० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि २०२० च्या दशकात ईएसजी अधिक सक्रिय चळवळ उदयास आली.
 
 
परिणामी ईएसजी आता एक व्यापक चौकटीत विकसित झाली आहे ज्यात पर्यावरण आणि सामाजिक प्रभावाभोवतीच्या मुख्य घटकांचा समावेश आहे, तसेच स्टेकहोल्डरचे कल्याण जास्तीत जास्त करण्यासाठी प्रशासकीय सुधारणा कशी केली जाऊ शकते याचा वेळोवेळी विचार यात होतो.
 
 
याव्यतिरिक्त संस्कृती, विविधता, मानवी हक्क, मूल्य , सगळ्या घटकांचे हितरक्षण अशा विविध विषयांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर यांची व्यापकता वाढण्याची शक्यता आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121