आपण सर्व निसर्गपुजकच आहोत

‘वनातल्या जनांच्या मनातल्या गोष्टी’ सांगण्यात रंगले मिलिंद थत्ते

    29-Oct-2023   
Total Views |






milind thatte


मुंबई (विशेष प्रतिनिधी):
जंगलात राहणारे लोक आणि आपण वेगळे नाही तर दोघेही निसर्गपुजकच कसे आहोत हे अनेक उदाहरणांमार्फत पटवुन देत प्रेक्षकांना जंगलातील गोष्टी सांगत ‘वनातल्या जनांच्या मनातल्या गोष्टी’ हा कार्यक्रम रंगला. रविवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता डोंबिवली येथे पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेमार्फत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यावरण दक्षता मंडळाच्या पर्यावरणीय दिनदर्शिकेचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.


पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था पर्यावरणाविषयी जनजागृती आणि अनेक उपक्रम राबविण्याचे काम करत असुन या संस्थेने २५ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. जल, जंगल आणि जमिन या त्रिसुत्रीने काम करणाऱ्या वयम् संस्थेचे मिलिंद थत्ते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते म्हणुन उपस्थीत होते. वनातल्या जनांच्या मनातल्या गोष्टी हा विषय घेऊन, गेली अनेक वर्षे वनवासींसाठी काम करण्याऱ्या या थत्ते यांनी जंगलातील जनांच्या आणि सामान्यांच्या सामाईक धागा सांगत त्यांना जोडण्याचा प्रयत्न केला. घराची वास्तूशांत करणारा सामान्य माणुस, त्यामागच्या धारणा, समजूती. संस्कृती आणि विज्ञान असै बहुअंगांनी पर्यावरण आणि वन उलगडत त्यांनी हे व्याख्यान विशेष रंगवले. निसर्गपुजक सामान्य आणि वनातील लोक ही आहेत असा दृढ विश्वास व्यक्त करत त्यांनी आपली संस्कृती ७००० वर्षं जूनी असल्याचे ही सांगितले. गावातील धान्यांच्या विविध लोककथा सांगत हे सत्र अधिकच रंगले.

विशेष म्हणजे, वयम् आणि पर्यावरण दक्षता मंडळ या दोन्ही संस्थांनी यंदा पंचविशी गाठली असुन दोन्ही सेवाभावी संस्था अविरतपणे काम करत आहेत. दरम्यान, वनातल्या जनांच्या मनातल्या गोष्टी या कार्यक्रमामध्ये गायन व नृत्य हे सांस्कृतिक सादरीकरणे करण्यात आली. पर्यावरणीय दिनदर्शिकेचे काम सुरभी वालावलकर-ठोसर यांनी केले आहे. पर्यावरण दक्षता मंडळाच्या सचिव संगीता जोशी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डोंबिवलीतील कामाची माहिती कार्यकारिणी सदस्या रुपाली शैवाळे यांनी दिली. उपस्थितांना मार्गदर्शन तसेच मिलिंद थत्ते यांचा परिचय मंडळाचे उपाध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी करून दिला. तर, पर्यावरण दक्षता मंडळाच्या अध्यक्ष मानसी जोशी यांनी अध्यक्षिय भाषण केले. या कार्यक्रमात सर्व उपस्थितांना रोपांचे वाटप करून त्याला वाढवण्याचे आवाहन केले गेले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.