'गुगल पे' देणार दिवाळीनिमित्त ५०१ रुपयांचा शगुन

    28-Oct-2023
Total Views | 220

google pay

मुंबई : लोकप्रिय पेमेंट अ‍ॅप 'गुगल पे'वर दिवाळीनिमित्त शुभेच्छांसोबत ५०१ रुपयांचा शगुन देणार आहे. यासोबतच एक खास भेट मिळणार आहे. मात्र, यासाठी तुम्हाला काही आव्हाने पूर्ण करावी लागतील. अमेरिकन कंपनी पेमेंट अ‍ॅपवर फेस्टिव्हल सिटी प्रमोशन चालवत असून याअंतर्गत हि भेट मिळणार आहे.

गुगल पे वरुन हि ऑफर जिंकण्यासाठी गुगल पे वर उघडून 'प्रमोशन' विभागातील फेस्टिव्हल सिटीवर जा. यात दिवाळीच्या नकाशावर अनेक प्रकारचे रंग क्षेत्र दिसतील. २० नोव्हेंबर २०२३पर्यंत नवनवीन आव्हाने नकाशावर अनलॉक केली जातील. जसजसे तुम्ही एक पायरी पुढे जाणार तसतसे अधिक आव्हाने अनलॉक होतील. आव्हाने पूर्ण केल्यावर तुम्हाला शगुन मिळेल.
 
या शगुनसोबत मिळणाऱ्या भेटीमध्ये पुढील वस्तूंचा समावेश असेल :
  • रेडमी नोट १२ मोबाईल
  • डॉमिनोझ, मिंत्रा, झोम्याटो, रिलायन्स स्मार्टवर ३०% सूट.
  • अॅमेझोन प्राइम मेंबरशिपवर १२० रुपयांची सूट.
  • युट्यूब प्रिमियमच्या मासिक सदस्यत्वावर ३०% सूट.
  • टाइम्स प्राइम वार्षिक सबस्क्रिप्शनवर ४५० रुपयांची सूट.
  • हॉटस्टारच्या ३ महिन्यांच्या सबस्क्रिप्शनवर १०० रुपये सूट.
  • एमएक्स प्लेअप वार्षिक सबस्क्रिप्शनवर १०० रुपये सूट.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121