मेट्रो ५ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण
28-Oct-2023
Total Views | 41
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५ मार्गिकेतील पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत आले आहे. या पहिल्या टप्प्यातील ठाणे – भिवंडी या मार्गावरील सर्व स्थानकांच्या स्लॅबचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे आता स्थानकातील रुळ बसवणे आणि इतर कामे यासाठी सुरुवात करण्यात येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने ठाणे – भिवंडी – कल्याण या २४.९०किमीच्या मेट्रो ५ मार्गिकेच्या कामाला सुरुवात केली होती. या मार्गिकेचे दोन टप्प्यात काम करण्यात येत होते. यातील पहिला टप्पा ठाणे – भिवंडी असा असून दुसरा टप्पा भिवंडी – कल्याण असा आहे.
तरी, पहिल्या टप्प्याचे आतापर्यंत एकूण ८१.५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यातील सहा मेट्रो स्थानकांचे ७६.९३ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच व्हायडक्टचे ८२.६३ टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील स्लॅबचे काम झालेल्या स्थानकांमध्ये बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पुर्णा, अंजूरफाटा आणि धामणकर नाका या सहा स्थानकांचा समावेश आहे.