मुंबई : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात (FSSAI)कडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार अर्ज प्रक्रिया दि. ३० ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होणार आहे. या भरतीद्वारे प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ खासगी सचिव, वैयक्तिक सचिव, सहाय्यक व्यवस्थापक (आयटी), सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक ग्रेड –२ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
तसेच, (FSSAI)मधील विविध पदांच्या एकूण ४२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०२३ असणार आहे. तसेच अर्जाची प्रत सादर करण्याची शेवटची तारीख ०४ डिसेंबर २०२३ असणार आहे.
दरम्यान, या भरतीकरिता अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता सहाय्यक संचालक (भरती), FSSAI मुख्यालय, ३रा मजला, FDA भवन, कोटला रोड नवी दिल्ली. तसेच, भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.