मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय २०२४’ लोकसभा प्रवासात शनिवार दि. २८ ऑक्टोंबर रोजी भिवंडी लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील व ‘संपर्क से समर्थन’ अभियानात भाग घेत सर्वसामान्य जनतेशी संवाद साधतील. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या प्रवासात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासोबत लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
• भिवंडी येथील कार्यक्रम
सकाळी १०.१५ वा. भिवंडी येथील धामनकर नाका परिसरातील पद्मानगर भाजी मार्केट येथे ‘घर चलो मोहीम’ अभियानात सहभागी होतील. सकाळी ११.१५ वा. याच भाजी मार्केट परिसरात समारोपीय मार्गदर्शन करतील. सकाळी १२.०० वा. भिवंडी येथील शांती चंदन ऑडिटोरियम, ओसवाल स्कूल ज्यू. कॉलेज जवळ येथे भिवंडी ग्रामीण, भिवंडी पूर्व आणि भिंवडी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी तसेच ‘सुपर वॉरिअर्स’ यांच्याशी संवाद साधतील. यासोबतच ते काही कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
• कल्याण येथील कार्यक्रम
दुपारी ०४.०० वा. कल्याण येथील आधारवाडी चौक जवळच्या गुरुदेव ग्रॅंड हॉटेल येथे शहापूर, मुरबाड व कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिअर्स व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सायं. ०५.४५ वा. कल्याण पश्चिम येथील अहिल्याबाई चौक ते लोकमान्य टिळक चौक पर्यंत ‘घर चलो अभियानात’ सहभागी होतील व सर्वसामान्य जनतेशी हितगुज करतील. सायं. ०६.४५ वा. कल्याण पश्चिमच्या लोकमान्य टिळक चौकात समारोपीय मार्गदर्शन करतील.
प्रदेश अध्यक्षांच्या प्रवासाचे नियोजन व तयारी केंद्रीय मंत्री कपील पाटील,आमदार किसन काथोरे, आमदार महेश चौघुले, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, राज्य लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, भिवंडी लोकसभा समन्वयक जितेंद्र डाकी, भिवंडी जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, ठाणे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, विशाल पाठारे, वैभव भोईर, राजू गाजंगी, कल्पना शर्मा, प्रवीण मिश्रा, भरत भाटी, निखिल चव्हाण, नितीन सपकाळ यांच्यासह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते करीत आहेत.