मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालयातील अनुवादक मराठी गट-क आणि हिंदी अनुवादक गट-क या संवर्गातील ७ पदे भरली जाणार आहेत. या भरतीसंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अधिसूचना जारी करण्यात आली असून अर्ज मागविण्यात येणार आहेत. दरम्यान, अर्जदारांकडून दि. ३० ऑक्टोबर २०२३ पासून अर्ज स्वीकृतीस सुरूवात होणार आहे. तसेच, उमेदवारास अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत दि. २० नोव्हेंबर २०२३ असणार आहे.
वेतनश्रेणी
अनुवादक मराठी गट-क
निवड झालेल्या उमेदवारास नियुक्तीनंतर दरमहा वेतन ३५,४०० ते १,१२,४०० रुपयापर्यंत पगार आणि नियमांनुसार भत्ते मिळू शकतात.
अनुवादक हिंदी गट-क
निवड झालेल्या उमेदवारास नियुक्तीनंतर दरमहा वेतन ३५,४०० ते १,१२,४०० रुपयापर्यंत पगार आणि नियमांनुसार भत्ते मिळू शकतात.