भारत’च!

    26-Oct-2023
Total Views | 87
modi

‘जी 20’ शिखर परिषदेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक नेत्यांसमोर ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असाच आपल्या मातृभूमीचा केलेला उल्लेख सर्वस्वी सुखावणारा होताच. आता पाठ्यपुस्तकांतूनही ‘भारत’ हेच नाव वापरण्यात यावे, अशी शिफारस ‘एनसीईआरटी’च्या समितीने केली आहे. वसाहतवादी मानसिकतेचे हे ओझे आजच्या आणि पुढील पिढीच्या खांद्यावर न देण्यासाठी केलेली ही शिफारस सर्वस्वी कौतुकास्पदच!

लेय पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असे नाव वापरण्यात यावे, अशी शिफारस ‘नॅशनल काऊंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग’ (एनसीईआरटी)ने स्थापन केलेल्या एका समितीने केली आहे. हजारो वर्षांपासून ‘भारत’ हेच देशाचे मूळ नाव होते. तसेच कालिदासांसह कुमारसंभवमसह अनेक विद्वानांनी तसा उल्लेखही केला आहे. ब्रिटिशांनी ‘इंडिया’ हा शब्द सुमारे 200 वर्षांपूर्वी वापरला. विद्यार्थ्यांना याची माहिती असणे महत्त्वाचे आहे, म्हणून ही शिफारस. समितीतील सर्वांनी याला सहमती दर्शवली आहे. तथापि, अंतिम निर्णय शिक्षण मंत्रालय तसेच ‘एनसीईआरटी’ यांना घ्यावयाचा आहे, असे समितीने म्हटले आहे.

पाठ्यपुस्तकांमध्ये ‘भारत’ हे नाव वापरायची शिफारस अनेक कारणांमुळे लक्षणीय म्हणायला हवी. ‘एनसीईआरटी’ ही सरकारी संस्था असून, संपूर्ण भारतातील शाळांसाठी पाठ्यपुस्तके विकसित तसेच प्रकाशित करण्याची जबाबदारी याच संस्थेवर आहे. लाखो विद्यार्थी हीच पुस्तके वापरतात. त्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना देशाच्या इतिहासाची योग्य माहिती देण्याची नैतिक जबाबदारी ही ‘एनसीईआरटी’ची. म्हणूनच ‘भारत’ हे नाव वापरण्याची शिफारस यथायोग्यच! हिंदू इतिहासाचा कालखंड हजारो वर्षांचा आहे. त्याला वैदिक परंपरा आहे, इतिहास आहे. त्यासाठी ‘भारत’ हे नाव वापरणेच हिंदू संस्कृती तसेच सभ्यतेला न्याय देणारे. ब्रिटिशांनी लादलेले ‘इंडिया’ हे वसाहतवादी मानसिकता दर्शवणारे पाश्चात्य नाव हटवण्याची शिफारस, ही उचितच. भारताच्या गौरवशाली, समृद्ध इतिहासाचे प्रतिनिधित्व करणारा ‘भारत’ आता विद्यार्थ्यांना वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडण्यास निश्चितच मदत करेल.
 
‘जी 20’ शिखर परिषदेवेळी भारत सरकारने देशाचा उल्लेख ‘भारत’ असा करावा, असे पत्राद्वारे सूचवले होते. ‘भारत’ हे देशाचे मूळ नाव असून, ‘इंडिया’पेक्षा ते अधिक समावेशक आहे. भारत हा देशाची वैविध्यपूर्ण संस्कृती तसेच इतिहासाची जाणीव करून देतो, असा युक्तिवाद करण्यात आला होता. ही विनंती अर्थातच मान्य करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोरील नामोल्लेखात ‘पंतप्रधान, भारत’ असा उल्लेख करण्यात आला होता. ‘जी 20’ शिखर परिषदेत ‘भारत’ असा जो उल्लेख केला गेला, त्यामुळे देशाच्या नावाची आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ अशी ओळख सांगितली गेली. ‘भारत’ या नावाच्या वापरास प्रोत्साहन देणारी ही घटना. सरकारचा तो प्रतीकात्मक विजय होता. आम्हाला आमच्या प्राचीन वारशाचा अभिमान आहे आणि आपली संस्कृती आणि इतिहास संवर्धनासाठी आपण कटिबद्ध असल्याचा संदेश भारताने संपूर्ण जगाला दिला.

भारत हे केवळ नाव नसून, त्याला समृद्ध अशी परंपरा लाभलेली आहे, याची माहिती जगाला झाली. त्याचवेळी भारताला आपल्या संस्कृतीचा अभिमान असून, आत्मविश्वासाने भारलेले, भरलेले हे राष्ट्र आहे, हाही संदेश दिला गेला. जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्यास त्याची मदत झाली. म्हणूनच ‘जी 20’ शिखर परिषदेत ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ असा केला गेलेला उल्लेख देशासाठी अत्यंत सकारात्मक असाच ठरला. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा गौरव त्यातून केला गेला.‘भारत’ आणि ‘इंडिया’ या दोन्ही संज्ञांचा भारतीय उपखंडाच्या संदर्भात ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या का महत्त्वाचा ठरतो, हेही समजून घेतले पाहिजे. ‘इंडिया’ या शब्दाची उत्पत्ती सिंधू नदीवरून झाली. भारतीय उपखंडाचे वर्णन करण्यासाठी तो वापरला गेला. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि भूतानचा काही भाग यात समाविष्ट आहे. तसेच या प्रदेशावरील ब्रिटिश कालावधीचा संदर्भ देण्यासाठी ‘इंडिया’ हा शब्द अधिकृतपणे स्वीकारला गेला, जो 1947 मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ‘इंडिया’ आणि ‘पाकिस्तान’ असा राजरोसपणे वापरला गेला.

‘भारत’ या शब्दाचे मूळ वेदांमध्ये आहे, प्रामुख्याने ऋग्वेद, हिंदू धर्मातील सर्वात प्राचीन आणि पवित्र ग्रंथांपैकी एक. ऋग्वेदानंतर विविध प्राचीन ग्रंथ, महाकाव्ये, पुराणांमध्ये ‘भारत’ हे भारतीय उपखंडाचे नाव म्हणून वापरले गेले आहे. म्हणूनच भारतीय राज्यघटनेत ‘भारत’ किंवा ‘भारत गणराज्य’ असाही उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र, ‘इंडिया’ बाह्य प्रभावांशी संबंधित असून, भारताचे मूळ भारतीय संस्कृती तसेच इतिहासात खोलवर आहे. भारत सरकार अधिकृतपणे देशाला हिंदी भाषेत ‘भारत’ म्हणून, तर इंग्रजीमध्ये ‘इंडिया’ असा उल्लेख करते.भारतात सध्या राष्ट्रीय तसेच सांस्कृतिक पुनरात्थानाची प्रक्रिया सुरु आहे. भारतीय तसेच अनिवासी भारतीय दोघांमध्ये भारतीय संस्कृती आणि वारशात वाढ होताना दिसून येते. दिवाळी, होळी, नवरात्री यांसारख्या भारतीय सणांच्या लोकप्रियतेवरून याचा अंदाज येतो. आज जगभरात, हे सण साजरे होत आहेत. भारत सरकार भारतीय संस्कृती तसेच वारसा यांचा सक्रियपणे प्रचार करत आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ज्या कुंभमेळ्याची ओळख आहे, त्यालाही सरकार पाठिंबा देते. भारतीय विविधतेबद्दल जागरूकता आणि उत्साह वाढलेला दिसतो. केरळमधील ओणम तर पश्चिम बंगालमधील दुर्गा पूजा उत्सव यांसारख्या विविध संस्कृती आणि सण साजरे करणार्‍या भारतीय सणांची वाढती लोकप्रियता ते अधोरेखित करते.

देशातील तरुणाई अधिकाधिक सशक्त होत असून, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्राधान्य देणार्‍या तसेच कला आणि विज्ञानात करिअर करणार्‍या तरूण भारतीयांच्या वाढत्या संख्येवरून ते स्पष्ट होते. सामाजिक तसेच राजकीय चळवळींमध्येही याच तरुणाईचा वाढता सहभाग, ही तरुणाई भारताशी जोडलेली आहे. भारताची संस्कृती तसेच परंपरा यांच्याशी नाते जोडणारी आहे. या तरुणाईला वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडायचे आहे. स्वतःची अशी ओळख प्रस्थापित करायची आहे. भारताचे होत असलेले राष्ट्रीय तसेच सांस्कृतिक पुनरुज्जीवन म्हणूनच महत्त्वाचे ठरते.भारतीय मध्यमवर्गाचा वाढता उदय, अर्थव्यवस्थेचे वाढते जागतिकीकरण तसेच समृद्ध वारशाची वाढती जागरूकता यातून पुनरुज्जीवन होत असून, ती एक बहुआयामी घटना आहे. त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर, समाजावर आणि संस्कृतीवर सकारात्मक परिणाम होत असून, जगभरात भारताची ताकद वाढवण्याचे काम करत आहे. भारताचे होत असलेले पुनरुज्जीवन हे भारतीयांच्या लवचिकतेचा आणि सामर्थ्याचा पुरावा आहे. भारताची एक समृद्ध आणि दोलायमान संस्कृती असून, ती पुढील पिढ्यांना समर्थपणे हस्तांतरित केली जाईल, याचे ‘भारत’ हे नाव साक्ष आहे.

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121