पीएफ खात्यासाठी फोन आला असेल तर सावधान! वृद्ध दाम्पत्याला ४ कोटींनी गंडवले

    26-Oct-2023
Total Views | 70

Cyber Crime


मुंबई :
राज्यात सायबर चोरट्यांची संख्या वाढली असून आता मुंबईतून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. येथील एका वृद्ध जोडप्याला ११ कोटी रुपयांचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तब्बल चार कोटी रुपयांनी गंडवले आहे. दक्षिण मुंबईतील ही घटना आहे.
 
एका मोठ्या कंपनीत नोकरी करणाऱ्या दक्षिण मुंबईतील एका वृद्ध जोडप्याचा एका कंपनीशी संपर्क आला. या कंपनीतील महिलेने त्यांना पीएफ विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तसेच वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी तिचे पती काम करत असलेल्या कंपनीचे नावही आरोपी महिलेने तिला सांगितले.
 
त्यानंतर आरोपी महिलेने वृद्ध महिलेला सांगितले की, तिच्या पतीने भविष्य निर्वाह निधीमध्ये ४ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. ते आता २० वर्षानंतर परिपक्व झाले असून तुम्हाला ११ कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच तिने यासाठी टीडीएस, जीएसटी आणि आयकर भरण्यासाठी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले.
 
महिलेने आरोपीला बँकेचे तपशील देताच आरोपीने तब्बल चार कोटी रुपये लुबाडले. त्यानंतर या वृद्ध जोडप्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी कफ परेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121