मुंबई : विजयादशमीच्या दिवशी किंवा १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. गौतम बुद्धांनंतर बौद्ध संप्रदायाचा प्रसार आणि शिकवण याला काहीशी खीळच बसली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर सामाजिक क्रांतीचा पाया रचला. यादिवशी त्यांनी नागपुरात कित्येकांना बौद्ध संप्रदायाची दीक्षा दिली.
सम्राट अशोक यांनी इसवी सन पूर्व तिसर्याच शतकामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जातो. याच दिवसाचं औचित्य साधत 1956 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर 14 ऑक्टोबर तारखेला नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर सुमारे 5 लाख अनुयायींसोबत डॉ. आंबेडकरांनी देखील बौद्ध धर्म स्वीकारला आणि पुढे नागपूरची धम्मभूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली.