नवी दिल्ली : 'मला प्रोटीन मिळत नाही, त्यामुळे मला षटकार मारता येत नाही', असा अजब तर्क पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज इमाम उल हक याने केला. त्याच्या विचित्र तर्कानंतर पाकिस्तान संघाची सर्वच स्तरावरून खिल्ली उडवली जात आहे. तसेच, भारतीय प्रेक्षकांनीदेखील त्याला चांगलेच लक्ष्य केले आहे. ते म्हणतात, खाण्यावर नव्हे, खेळावर लक्ष द्या, असा सल्लादेखील त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, पाकिस्तानी फलंदाज इमाम उल हकने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत दावा केला की त्यांच्या संघाचे फलंदाज प्रोटीन खात नाहीत आणि त्यामुळे त्यांना षटकार मारता येत नाही. पॉवरप्ले ओव्हर्समध्ये षटकार मारता यावा म्हणून कार्बोहायड्रेट्सऐवजी प्रथिनांचा आहारात समावेश केला पाहिजे, असे तो म्हणाला.
दरम्यान, मायकेल मखाल यांनी लिहिले की, भारतातील निम्म्याहून अधिक क्रिकेटपटू शाकाहारी आहेत पण तरीही पाकिस्तान संघापेक्षा चांगली कामगिरी करतात. असे सांगतानाच त्यांनी एका म्हणीचादेखील उच्चार केला. ते म्हणाले, पाकिस्तानच्या संघाची ही अवस्था म्हणजे नाचता येईना पण अंगण वाकडे अशीच झाली आहे.
यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तान संघाची कामगिरी सामान्य अशीच राहिली आहे. याच सुमार कामगिरीवर आता पाकिस्तानी संघाचा डावखुरा फलंदाज इमाम उल हकने अजब दावा केला आहे. तो म्हणाला की. आम्हाला पुरेसे प्रोटीन मिळत नसल्यामुळे आम्हाला षटकार आणि चौकार मारता येत नाही.
इमामच्या या अजब दाव्यामुळे क्रिकेटरसिकांना हास्याच्या उकळ्या फुटल्याचे पाहायला मिळाले. विश्वचषक २०२३ मध्ये पाकिस्तान संघाने ४ सामने खेळले असून दोन सामन्यात विजय मिळविलाय तर दोन सामने पाकला गमवावे लागले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुध्द पाकिस्तानला पराभव पत्कारावा लागला.