पुन्हा एकदा मोदी सरकार ! प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दावा

    22-Oct-2023
Total Views | 20

chandrashekhar bavankule

नागपूर :
भारतीय जनता पक्षाच्या राज्यव्यापी महाविजय २०२४ अभियानांतर्गत गेल्या दोन महिन्यांत २१ लोकसभा क्षेत्रात दौरा करताना ३३हजार ६९७ नागरिकांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पसंती दिल्याने 'पुन्हा एकदा मोदी सरकार' हे ध्येय साध्य करण्यासाठी महाराष्ट्र भाजप कटिबद्ध आहे, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. या २१ लोकसभा प्रवासाचा विस्तृत गोषवारा देणारी एक पोस्ट बावनकुळे यांनी ट्विटरवर प्रसारित केली आहे. बावनकुळे यांचा सद्या ‘मिशन 45+’साठी राज्यव्यापी दौरा सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी माहिती दिली आहे.

बावनकुळे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले, "आतापर्यंत २१ लोकसभा मतदारसंघांचा दौरा केला. या प्रवासात ३३ हजार ७१० नागरिकांशी थेट संवाद साधला असून, पंतप्रधान म्हणून तुम्हाला कोण आवडेल? असा प्रश्न विचारला. त्यापैकी ३३ हजार ६९७ लोकांनी पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदी यांना प्राधान्य दिले. तर इतर पक्षांच्या नेत्यांना केवळ १३ जणांनी पसंती दिली. त्यापैकी फक्त ४ राहूल गांधी समर्थक होते."

ते म्हणाले की, "गेल्या साडेनऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासामुळे, संपूर्ण जगात भारताचा गौरव केला. स्वावलंबी भारताची शपथ घेऊन, महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा मोदीजींना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या या प्रेमाच्या जोरावरच लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून येतील, असा विश्वास आहे. 'पुन्हा एकदा मोदी सरकार' हे ध्येय साध्य करण्यासाठी महाराष्ट्र भाजप कटिबद्ध आहे," असा दावाही बावनकुळेंनी केला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

ED काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी संबंधित असणार्‍या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने शनिवारी कार्यवाहीस सुरूवात केली. या मालमत्तेत दिल्ली, मुंबई आणि लखनऊमधील प्रमुख असणाऱ्या मालमत्तांचा समावेश आहे. काँग्रेसच्या संबंधित असणाऱ्या कंपनीशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीकडे ६०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी देशाची राजधानी दिल्लीतून बहादूर शाह जाफर मार्गावरील प्रतिष्ठित हेराल्ड हाऊस आहे...

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121