मुंबई : इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्च अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जात आहे. याभरतीसंदर्भात आयसीएमआरकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच, या भरतीच्या माध्यमातून टेक्निकल असिस्टंट, टेक्निशियन, लॅव अटेंडट ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. तरी या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आयसीएमआर अंतर्गत होणाऱ्या भरतीद्वारे तंत्रज्ञ टेक्निकल सहाय्यक (गट-ब) या पदांच्या एकूण २२ जागा तर टेक्निशियन पदाच्या गट-क मधील २१ जागा भरल्या जाणार आहेत. तसेच, लॅब अटेंडंट पदाच्या ३१ जागा भरल्या जाणार आहेत. आयसीएमआरमधील या रिक्त जागांसाठी अर्जदारांनी दि. ०५ नोव्हेंबर २०२३ असणार आहे.