भारतीय विमानतळ प्राधिकरणात काम करण्याची सुवर्णसंधी: जाणून घ्या

    20-Oct-2023
Total Views | 28
Work Opportunity to Work in Airports Authority of India

मुंबई :
भारतीय विमानतळ प्राधिकरण अर्थात एयरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडिया अंतर्गत लवकरच भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. Aभारतीय विमानतळ प्राधिकरणाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधरांना नोकरीची संधी मिळणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणांतर्गत 'एअर ट्राफिक कंट्रोल' या विभागाच्या एकूण ४९६ जागा भरल्या जाणार आहेत.

दरम्यान, या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून दि. ०१ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्राफिक कंट्रोल) या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार असून अंतिम मुदत दि. ३० नोव्हेंबर २०२३ असणार आहे.

तसेच, या पदांच्या आवश्यकतेनुसार, उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार असून अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने करावयाचा आहे. या भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या."


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121