मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाने भारतीय जनसंपर्क परिषद, मुंबई विभागाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ३० सप्टेंबर रोजी 'कॉर्पोरेट कम्युनिकेशन' या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादाला भारतीय जनसंपर्क परिषद, मुंबई विभागाचे अध्यक्ष डॉ. हुमायून जाफरी, 'नवभारत टाइम्स'चे उपाध्यक्ष हेमंत कुलकर्णी, कॉर्पोरेट क्षेत्रातील सूर्यकांत मिश्रा, धनेश सावंत इ. उपस्थित होते.
विद्यापीठ पातळीवर आयोजित केलेल्या या एकदिवसीय परिसंवादाकरता डॉ. शमाली गुप्ता, महेश जळगावकर, नौमान कुरेशी, व्हॅलेंटाईन वाझ, राजीव बॅनर्जी हे पाच प्रमुख मार्गदर्शक लाभले होते. हा परिसंवाद एकूण पाच सत्रात विभागला होता. या परिसंवादाच्या माध्यमातून कॉर्पोरेट क्षेत्रातील या पाचही व्यक्तींनी स्वतःचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना भविष्यातील वेगवेगळ्या नवीन क्षेत्रांची ओळख करून दिली.
पहिल्या सत्रात डॉ. शमाली गुप्ता यांनी प्रॉडक्ट कैम्पेन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. प्रॉडक्ट कैम्पेन करताना उद्देश, लक्ष्य, अर्थकारण या सर्व गोष्टी किती आणि कशा महत्वाच्या आहेत याबाबत त्यांनी माहिती दिली. दुसऱ्या सत्रात महेश जळगावकर यांनी डिजिटल पब्लिक रिलेशन स्ट्रेटजिबाबत मार्गदर्शन केले. यात AI मुळे उद्भवणाऱ्या अडचणी त्यांनी सांगितल्या. तिसऱ्या सत्रात नौमान कुरेशी यांनी क्रायसिस कम्युनिकेशन यावर चर्चा केली. चौथ्या सत्रात कॉर्पोरेट क्षेत्रातील सध्याची महत्वाची गोष्ट म्हणजे इनफ्लुअनसर इगेंजमेंट याविषयी व्हॅलेंटाईन वाझ यांनी मार्गदर्शन केले. तर शेवच्या सत्रात राजीव बॅनर्जी यांनी कॉर्पोरेट संवादबाबत मार्गदर्शन केले.